चर्चा:दुसरे महायुद्ध

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by Abhijeet Safai in topic धन्यवाद

'आशिया' वि. 'एशिया' संपादन

मराठीमध्ये 'आशिया' हे नाव रुळलेले आहे; तेव्हा मराठी विकिपीडियावर Asia या खंडाच्या विशेषनामाकरता 'आशिया' असे नाव वापरावे असे मला वाटते. एशिया लेखाच्या चर्चापानावर याबद्दल एकदा चर्चा झाली होती. तेव्हा मांडलेला मुद्दा संदर्भ लागावा म्हणून पुन्हा मांडतो:

एशिया हा उच्चार(नाव नव्हे) इंग्लिश भाषेत आहे; पण मुळात 'Asia' ला 'एशिया' हे नाव इंग्रजांनी ठेवले नाही. ते ग्रीक/रोमन लोकांच्या इतिहासात वापरले गेले आहे आणि त्याचे रोमन स्पेलिंग Asia असले तरी खुद्द युरोपात वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचा उच्चार वेगळा होतो (आणि जर्मन सारख्या इंग्लिश भाषेच्या नात्याने 'थोरल्या' असलेल्या भाषेतदेखील 'Asien' असे स्पेलिंग केले जाते.. उच्चार 'आजियन्‌' असा होतो). थोडक्यात, 'एशिया' या उच्चाराला प्रमाण मानावे हा आग्रह साधार वाटत नाही.

दुसरी गोष्ट अशी की 'आशिया' हे विशेषनामदेखील आपल्याकडे गेले काही दशके (कदाचित शतके) रूढ आहे; त्यामुळे त्याला मुख्य पान ठेवावे असेच माझे मत अजूनही आहे.

अजून एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मराठीतील वृत्तपत्रीय लिखाणात, प्रसारमाध्यमांतदेखील 'आशिया', 'आशियाई' अशी विशेषनामे रुळली आहेत; परिणामी ती नावे सर्वसामान्य मराठी माणसांच्या तोंडी बसली आहेत.

या लेखात व इतर अनेक लेखात Asia हा शब्द वारंवार येणार असल्याने, लेखनात सुसंगती राहण्याकरता याबद्दल आताच निश्चित विचार करणे गरजेचे आहे. विकिकरांनी कृपया आपली मते मांडावीत.

--संकल्प द्रविड 05:22, 20 डिसेंबर 2006 (UTC)

जुनी/नवी मते येथे परत मांडण्यापेक्षा एशिया चर्चा पानावरच मांडावी.
केदार {संवाद, योगदान} 09:04, 20 डिसेंबर 2006 (UTC)

Cryptography, war crimes संपादन

Cryptography आणि war crimes यांना मराठी प्रतिशब्द सुचवा.

अभय नातू 05:42, 20 डिसेंबर 2006 (UTC)

  1. Cryptography = कूटलेखन (कूट = crypting, लेखन = graphy)
  2. war crimes = युद्धगुन्हे (सलग शब्द लिहावा.. सामासिक शब्द आहे.). मराठी वृत्तपत्रांमध्ये मिलोसेविच, अबू गरीब वगैरे संदर्भात असा शब्द वाचल्याचे स्मरते. पण खात्री करून घ्यायला हवी.
--संकल्प द्रविड 06:43, 20 डिसेंबर 2006 (UTC)

Titles of articles संपादन

Hi,

Titles of some of the articles such as 'हिवाळी युद्ध' may be changed to 'दुसरे महायुद्ध/हिवाळी युद्ध 1939'.
Do suggest.
Regards,

Harshalhayat 06:42, 20 डिसेंबर 2006 (UTC)

Hi,

I do not see a conflict with antoher title or even an event of same name, so prefer to keep it, since that is how it is known 'winter war' :-)

If disambiguation is needed, let's change it the way you suggest.

अभय नातू 07:00, 20 डिसेंबर 2006 (UTC)

appeasement = सहिष्णुता? I've used this word for lack of better alternative. लांगूलचालन seems too strong a word. Or is it?

Suggest.

अभय नातू 07:31, 20 डिसेंबर 2006 (UTC)

सहिष्णुता doesn't fit (yeah, I know you know that). लांगूलचालन expresses the meaning but indeed seems too strong. How about भलावण? Not exactly "appeasement" (according to Molesworth), but I have seen it used in that sense.
Perhaps we ask a Marathi politician (or Marathi political journalist) :-)
केदार {संवाद, योगदान} 09:23, 20 डिसेंबर 2006 (UTC)
To appease - सांत्वन करणे - संदर्भ वीरकर शब्दकोश.
61.17.74.17 07:26, 23 डिसेंबर 2006 (UTC)

कोर v कॉर्प्स संपादन

बरोबर उच्चार काय आहे?

इंग्लिशमध्ये corpsचा उच्चार बहुतांश कोर असा होतो. korpsचा जर्मन उच्चार काय आहे?

तसेच, जनरल रोमेलचे नाव अर्विन कि इर्विन?

इंग्लिश शिकताना बरोबर उच्चार "कोर" आहे असेच वारंवार मला सांगण्यात आले आहे. प्रचलित मराठीत वेगळा उच्चार असू शकतो (पण काही वाचल्याचे आठवत नाही).
केदार {संवाद, योगदान} 18:35, 22 डिसेंबर 2006 (UTC)
कॉर्प्स(corpse)=मुडदे असे असल्यामुळे लश्करी अधिकारी न चुकता कोर असे ठासून सांगतात. :-)
मला वाटते आफ्रिका कॉर्प्स/कोर साठी जो जर्मन उच्चार असेल तोच वापरावा.
अभय नातू 18:37, 22 डिसेंबर 2006 (UTC)


दोस्त राष्ट्रे संपादन

Allied forces : या शब्दासाठी दोस्त राष्ट्रे ऎवजी 'मित्र राष्ट्रे' हा शब्द योग्य वाटतो. इतिहासाच्या पुस्तकांमधे 'मित्र राष्ट्रे' हा शब्दोपयोग केलेला आढळतो.

समसमीक्षा संपादन

  • अक्ष राष्ट्रे,दोस्त राष्ट्रे ,नाझी पक्ष , व्हर्सायच्या तह संबधीत खालील लेख पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.
  • संबधीत असंख्य लेख भाषांतर पूर्ण करण्यास बर्या पैकी वेळ लागू शकतो.त्या संदर्भात प्रकल्प कॅटेगरी बनवून पूर्ण करण्यास उपलब्ध करावेत.
  • त्या शिवाय ब्रिटन ने भारतातून मिळवलेली मदत,भारतिय राष्ट्रीय काँग्रेस, आझाद हिंद सेना, सावरकर , भारतिय कम्युनिस्ट पक्ष, भारतिय संस्थानिक यांचे वेगवेगळे दृष्टीकोण,तत्कालिन भारतीय अर्थकारणावर झालेला परिणाम यांची माहिती देणारा लेख बनवायला हवा आहे.

Mahitgar १४:१२, ३० जानेवारी २००७ (UTC)

माहितीचौकटीत चित्र व त्याखालील चित्रवर्णन तळटिपेचा क्रम चुकला आहे असे वाटते.चित्रांना क्रमांक व तोच क्रमांक तळ टिपांना दिल्यास ते योग्य होइल असे वाटते.

V.narsikar ०७:३२, १६ सप्टेंबर २००९ (UTC)

धन्यवाद संपादन

हा लेख अतिशय माहितीपूर्ण आहे. त्यामुळेच लेख वाचताना ज्ञानात भर पडते आणि म्हणूनच वाचताना आनंद होतो. लेख तयार करणाऱ्या सर्वांचे आभार. धन्यवाद. आभिजीत १७:४२, २९ जून २०१२ (IST)Reply

"दुसरे महायुद्ध" पानाकडे परत चला.