[] ठेलारी

ठेलारी जातीचा मेंढपाळ हा मुख्य व्यवसाय असून. महाराष्ट्रात ठेलारी जातीला NT-B प्रवर्गात २७ नंबर चे स्थान आहे.

वर्तमान स्थिति

आज ठेलारी समाजाला खानदेशात(धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव ) मेंढपाळ समाज व ठेलारी समाज म्हणून ओळखतात. ठेलारी समाज पूर्णत जंगलात बठकणारा समाज आहे. ते शेतकऱ्यांच्या संपर्कात जास्त प्रमाणात येत असता कारण शेळ्या मेंढ्या शेतात बसाऊन खताच्या बदल्यात अन्नधान्य मिळवतात. १९५१ साली जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या जमातींना गुन्हेगार मुक्त केले आणि त्यांनतर १९५५ - १९५८ दरम्यान ठेलारी समाज सध्याच्या अधिवासात स्थायिक झाले आणि लहान शेतजमिनींची खरेदी केली. त्या शेतजमिनीं अजूनही आहेत, शेळया आणि मेंढ्यांची संख्या वाढवून डोंगराळ भागातील चांगल्या गवताळ प्रदेशांमध्ये जातात. ते एका विशिष्ट हंगामात मेंढ्यांचे कळपा बरोबर प्रवास करतात आणि हंगामाच्या समाप्तीनंतर परत येतात. सरकारने त्यांना काही लागवडदार जमीनदेखील दिली आहे ज्यायोगे त्यांना त्यांच्या शेळ्या/मेंढ्या साठी काही शेती उत्पादन व चारा मिळू शकेल. ते जवळील डोंगराळ भागात आपल्या मेंढरांसह फिरत असतात , त्यामुळे मेंढी साठी योग्य चारा मिळवू शकतात आणि ते मेंढ्याच्या खतांच्या बदल्यात काही प्रमाणात अन्नधान्य मिळवतात. मुख्यत महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ठेलारी समाज आढळतो. आणि मुख्यतः मेंढी चराईसाठी दक्षिणेकडील डोंगराळ भागात, सातपुडा रांगांमध्ये स्थलांतरित होतात. खानदेशात ते अजूनही जंगलात एक भटक्या जीवनशैलीत जगत आहेत, तसेच ठेलारी समाजाकडे थोड्या प्रमाणात शेतजमीन आहे. या प्रदेशाचे हवामान उन्हाळ्यात गरम आणि कोरडे आहे जूनच्या अखेरीपर्यंत ते ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पडतो. हिवाळी हवामान थंड आणि कोरडी आहे कमाल तपमान 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतो आणि वार्षिक पाऊस 75 ते 125 सें.मी. इतका होतो. मेंढी पाळण्यासाठी हे डोंगराळ पठार आणि खेडूत जमीन सर्वोत्तम अनुकूल मानतात. ठेलारी समाजाची भटक्या समाज म्हणून ओळख आहे आणि मेंढी पालन हा त्यांचा पारंपरिक उद्योग आहे. ठेलारी समाजाची ची मुख्य भाषा चांदशी अहिराणी असून मराठी, हिंदी आणि गुजराती मिश्रित आहेत. त्यांची मुले मराठी मध्यम मध्ये शिक्षण घेतात. ते मराठीत बोलतात. त्यांपैकी काही हिंदी आणि गुजराती समजू शकतात. खान्देशांत ठेलारी समाजाची लोकसंख्या 5-6 लाख असून ८० टक्के लोक मेंढपाळ व्यवसाय करता आणि पूर्णत जंगलात राहून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवतात. ठेलारी समाजात अजूनही जातपंचाईतचे अस्तिव टिकून आहे . त्यांच्यात मुलामुलींची लग्न लहानपणी होत असल्यामुळे आंतरजातीय प्रेमविवाह कधीच होत नाही. ठेलारी समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. भारतातील ह्या मुख्य मेंढपाळांची अवस्था सामाजिक दृष्टया ,संसारिक दृष्टया आदिवासी पेक्षा हि बिकट आहे. आदिवासींना तरी झोपडी असते यांना राहायला झोपडीही नशिबी नाही.

   सामाजिक
ठेलारी समाजात दोन सामाजिक विभाग आहेत ज्याला ढवळ्या मेंढीवाले आणि काळ्या मेंढीवाले म्हटलेजाते. ढवळ्या मेंढीवाले आणि काळ्या मेंढीवाले दोघांच्या चालीरीती एकच आहेत परंतु ते एकमेकांत लग्न जुळवत नाहीत. दोघांना इतर समाजात समान दर्जा आहे . दोघे समान प्रमाणात प्रगत आहेत. ढवळ्या मेंढीवाले आणि काळ्या मेंढीवाले भेद हे स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५१ नंतर निर्माण झाले आहेत कारण १९५१ पूर्वी हे भेद नाहोते. ई.स. १८०० मध्ये ठेलारी समाजाला गुन्हेगार जात किंवा भटक्या जाती म्हणून ओळखले जात असे त्या वेळेस सुद्धा दोघे एकत्र वावरत होते आणि दोघांना समान दर्जाहोता. ढवळे आणि काळे हे दोघ एक असल्याचा पुरावा म्हणजे खिल्लारी शब्द. ज्या वेळेस दोघे खिल्लारी म्हणून वावरत होते आणि एक होते त्यावेळेस ढवळे आणि काळे भेद नाहोते आणि जसे काळे खिल्लारी चे ठेलारी झाले तसेच ढवळे सुद्धा खिल्लारी चे ठेलारी झाले याचे मुख्य कारण दोघे भावबंद व परस्पर संबंधी होते हे दोघ पुरावे ते एक आहेत हे सिद्ध करता. ठेलारी समाजाची आडनावे सरक, हाके, वाघमोडे, श्रीराम, सरगर, देवकाते, गोपणे, टेळे, येळे, कुलाळ, कोळेकर, केसकर, कोरडकर, कोपनर,  भिसे,  करणवर, महानोर, खताळ, सरक, खटके, सोन्नर, तांबे, सुळ, बुरुंगले,रूपनर, बाचकर, बोरकर, वाघमोडे, कारंडे,थोरात ,वाक्से , करे ,कोळपे , सोनकर आणि अनेक आहेत. ठेलारी समाज खूप प्रेमळ आहे.

संघटना
 जिल्ह्यातील किंवा राज्य स्तरावरील ठेलारी समाजाची ३१ मे २०२० रोजी युवा ठेलारी संघ - YUVA THELARI SANGH (Y.T.S.) हि संघटना उदयास आली. या संघटनेने समाज विकासाची कास धरून समाजाला योग्य प्रवाहात आणायचे यासाठी जिद्दीने कामाला सुरुवात केली. YTS हि NGO बनवून समाजाचा विकास करेल असे मत युवा ठेलारी संघ-Y.T.S चे  आहे.
   आधुनिकरणाचा भटक्यांच्या आचारविचारांवर अद्याप परिणाम झालेला नाही. अलिप्तपणामुळे त्यांच्यात मागासलेपणा दिसून येतो. म्हणून त्यांना भेडवसाणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय लक्षात घेणे आवश्यक ठरते.

२७ जुलै २०२० पासून Protected संपादन विनंत्या

संपादन

Sureshsarak (चर्चा) १३:३८, २७ जुलै २०२० (IST)Reply

  1. ^ साचा:Https://books.google.co.in/books?id=OmBjoAFMfjoC&pg=PA1987&dq=Thelari&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjiuv20l-HqAhU8zTgGHSPUBV8Q6AEwAHoECAAQAg
"ठेलारी" पानाकडे परत चला.