चर्चा:ज्वालामुखीय राख
Latest comment: ४ वर्षांपूर्वी by Tanuja.dhamal in topic ज्वालामुखी
ज्वालामुखी
संपादन. ज्वालामुखीची भूरूपे:- ज्यावेळी लाव्हारस थंड होतो आणि त्याला घनरूप अवस्था प्राप्त होते त्यावेळी त्यापासून अनेक प्रकारची भूरुपे निर्माण होतात.
1)लाव्हा घुमट- ज्यावेळी मॅग्मा हा मुखातून बाहेर येऊन तेथेच घनरूप बनतो, त्यावेळी घुमटाकार टेकडीची निर्मिती आम्ल लाव्हारसापासून होते. लाव्हारसाच्या प्रवाहीपणावर या घुमटांचे आकार ठरतात. तीव्र उतारांच्या उंच घुमटाकार टेकड्यांची निर्मिती आम्लं लाव्हारसापासून होते. अल्कली लाव्हामुळे कमी उंचीचे विस्तृत तळ असलेले घुमत तयार होतात. 2) लाव्हा पठारे - भेगीय ज्वालामुखी तून पसरणाऱ्या लाव्हारसापासून याची उत्पत्ती होते.मोठ्या प्रमाणात विस्तृत भूपृष्ठावर लाव्हारस पसरल्यामुळे अशा पठारांची निर्मिती होते. भारतामधील दख्खनचे पठार हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. 3)ज्वालामुखीय काहील - काही वेळा, ज्वालामुखीय उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणावर पदार्थ बाहेर पडतात व त्याच वेळी खूप मोठ्या प्रमाणात दाबमुक्ती होते.उद्रेकानंतर या भागात मोठ्या आकाराचे व खोलवर खळगे तयार होतात यांना ज्वालामुखीय काहील असे म्हणतात असे खळगे काही वेळा सुमारे दहा किमी पेक्षाही अधिक रुंद व शेकडो मीटर खोल असतात. कालांतराने तेथे सरोवरांची निर्मिती होते. लहान आकाराच्या ज्वालामुखीय काहीलींना ज्वालामुखीय विवर म्हणतात. 4) विवर सरोवर - ज्वालामुखीय विवर ज्यावेळी पावसाच्या पाण्याने भरले जाते तेव्हा ते विवर सरोवर म्हणून ओळखले जाते. 5)ज्वालामुखीय खुंटा - ज्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाशी लाव्हारसाचे घनीभवन होते त्यावेळी याची निर्मिती होते. 6)खंगारक शंकु - ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात घनरूप पदार्थ बाहेर पडतात. यात राख ,अर्धवट जळलेल्या निखारयासारखे पदार्थ व सकोणाश्म याांचा समावेश होतो.अशा पदार्थांचा संचयातून शंक्वाकृती टेकडी निर्माण होते.या अर्धवट जळालेल्या निखारयाना खंगारक म्हणतात.इटलीतील नुओवो पर्वत हे याचे उदाहरण आहे 7)संमिश्र शंकु - लाव्हारस व अर्धवट जळालेल्या पदार्थांच्या एकावर एक तयार झालेल्या स्तरांमुळे संयुक्त शंकूची निर्मिती होते. दोन वेगवेगळ्या पदार्थांपासून हा शंकू तयार झालेला असल्याने त्यास संमिश्र शंकु असे म्हणतात.ते सममिती आकाराचे असतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील सेंट हेलन्स Tanuja.dhamal (चर्चा) १४:५०, ४ एप्रिल २०२० (IST)