चर्चा:छिंग राजवंश
- इंग्लिश विकिपीडियावर जी उच्चारपद्धती दिलेली आहे त्यावरून लेखनामाबद्दल शंका येते. तिथे दिलेल्या संदर्भानुसार पिन्यिन उच्चारपद्धतींत किंग चाओ तर वेड-गिल्स उच्चारपद्धतींत चिंग चाओ असे आहे. लेखनाम "च" वर्गात असल्यामुळे लेखकास चिंग राजवंश अभिप्रेत असावा (म्हणजे त्याने वेड-गिल्स उच्चारपद्धतींचा संदर्भ घेतला असावा). त्यानंतर IPA वर्णमालेतील जी अक्षरे दिलेली आहेत त्यातूनही चिंग असाच उच्चार निघतो (च ची वेगळी छटा, पण छ नव्हे!) ह्यावर विकिपीडियन्सनी मते द्यावीत.
- Qing Dynasty http://en.wikipedia.org/wiki/Qing_Dynasty
- corresponding IPA - http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:IPA_for_Mandarin
- अनिरुद्ध परांजपे १३:१९, २२ जून २०११ (UTC)
- अनिरुद्ध, सिंगापुरात राहत असल्यामुळे माझ्या ऑफिसातल्या चिनी सहकार्यांकडून हे उच्चार समजून घेतले होते. हे उच्चार मराठी देवनागरीच्या मर्यादांमुळे अचूक लिहिणे अवघड आहे. त्यांपैकी फीन्यिनीतल्या "Qi" हा समूहाचा उच्चार च्हि अश्या लेखनाच्या उच्चारासारखा (आणि बोलीत बर्याचदा छिच्या वळणावर धावणारा) ध्वनी ऐकू येतो.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२८, २२ जून २०११ (UTC)
माझी टिप्पणी
संपादनया संदर्भात मी सुंग राजवंशाच्या चर्चापानावर दिलेली टिप्पणी वाचावी. Ch मध्ये काही बदल न होता स्पेलिंग Ch असेच राहिले. त्यामुळे प्रस्तुत उच्चार चिंग चाओ असा असला पाहिजे....J १६:०६, २२ जून २०११ (UTC)
- हा उच्चारही चिन्यांकडून वदवून घेतला आहे काय ?
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२२, २२ जून २०११ (UTC)
चीनचे नाव
संपादनचिनी लोक एके काळी भारतात रेशमी वस्त्रे घेऊन विकायला येत असत. तेव्हा त्यांच्या तोंडी सततच चिन, चिंग, चुन असे शब्द ऐकायला मिळत. तेव्हा तत्कालीन हिंदुस्थानातील लोकांनी त्यांना चिनी म्हणायला सुरुवात केली, आणि त्यांच्या देशाला चीन. ब्रिटिशांनी हे नाव ऐकून त्या देशाचे नाव China ठेवले. म्हणजे च हा उच्चार चिनी भाषांत फारफार पूर्वीपासून आहे. तो ऐकण्यासाठी चिनी माणसाला मुद्दाम वदवून घेण्याची गरज नाही. कुठल्याही चिनी पार्श्वभूमीवरच्या चित्रपटात ते अक्षर हजारदा ऐकायला मिळते....J १७:२९, २२ जून २०११ (UTC)
- ok... स्थानिक उच्चारपद्धतींविषयी जाणून घेण्याचे माझे प्राथमिक साधन म्हणजे इंग्लिश विकिपीडियावरील IPA संकेत. (अर्थातच त्यानेही मूळ/खरा उच्चार स्पष्ट करता येतोच असे नाही, आणि तसे तेही कबूल करतात). आणि ते जर च्हिंग (आणि पर्यायाने छिंगकडे झुकला असेल) तर तेच ठेवावे आणि किंग/चिंग वरून पुनर्निर्देशने ठेवावी म्हणजे ह्यासंदर्भात जाण्कार नसलेला वाचकास हवा तो लेख सहज मिळू शकेल. (म्हणजे त्याने इंग्लिश नावावरून search केले तर).
- अनिरुद्ध परांजपे १७:४२, २२ जून २०११ (UTC)
- ता.क. J, मी पोस्ट करतानाच तुमचा संदेश आलेला वाचला. च्ह चे भारतीयकरण होउन त्याचे च म्हणजे च्हिन, च्हिंग, च्हुन चे चिन, चिंग आणि चुन झाले असावे असे तुम्हाला वाटत नाही काय???
- अनिरुद्ध परांजपे १७:४२, २२ जून २०११ (UTC)
- जे, मुद्द्याला धरून लिहा. :)
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:५९, २२ जून २०११ (UTC)
मुद्द्याशी सुसंगत
संपादनचिनी भाषेत च हा उच्चार आहे हे सिद्ध करण्यासाठी हा इतिहास सांगावा लागला. तसा सांगणे मुद्द्याशी सुसंगत आहे...J १८:२४, २२ जून २०११ (UTC)
इंग्रजी विकिपीडियावरचे IPA संकेत.
संपादनIPA संकेत आपण पाळतोच असे नाही. यूटा चा उच्चार यूटा असा दिला असताना आपण युटा घेतला. Minnesotaचा IPAत मिनिसोटा असताना मिनेसोटा स्वीकारला गेला. कारण असे की, इंग्रजी विकिपीडियावर स्थानिक उच्चार दिलेले नसून अमेरिकन उच्चार दिलेले असावेत. भारतात ब्रिटिश आणि तेही ऑक्सफर्डच्या कोशातले उच्चार प्रमाण मानायची संस्कृती आहे. लंडन शहराच्या दक्षिण भागातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील लोक जसे उच्चार करतात तसे उच्चार(Received Pronunciations) ऑक्सफर्डच्या कोशात दिलेले असतात. ते लंडनच्या अन्य भागातल्यापेक्षासुद्धा वेगळे असू शकतात. म्हणूनच डॅनियल जोन्ज़(आता दिवंगत) या लंडन विश्वविद्यालयातील उच्चारशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि त्यांच्या इतर मदतनिसांनी लिहिलेल्या उच्चारकोशातील उच्चार जगातले बहुतेक इंग्रजी शिकू इच्छिणारे लोक प्रमाण मानतात.(इंग्रजीची लॅटिन लिपी ही उच्चाराधिष्ठित नसल्याने लोक विविध प्रकारे उच्चार करणारच, पण BBCवर होतात ते प्रमाण उच्चार याबद्दल कुणाचे सहसा दुमत नसते.)...J १८:२४, २२ जून २०११ (UTC)
- J, मी IPA हा माझा प्राथमिक स्त्रोत आहे इतकेच म्हणालो आणि तो परिपूर्ण असतोच असे नाही हे कंसातही स्पष्ट केले आहे मी.....
- अनिरुद्ध परांजपे १८:३६, २२ जून २०११ (UTC)