चर्चा:चातुर्वर्ण्य
चातुर्वर्ण्याची रचना एका अतिंद्रिय शास्त्रातून झाली आहे. प्रत्येक व्यक्तीचे तेजोवलयाच्या वर्ण, त्याच्या गुण एवं कर्मसंस्कारानुरुप राहतो. व्यक्तीगणिक असे वर्ण अनंत असतील परंतु या सर्व वर्णवलयांची विभागणी ऋषींनी केवळ चार उपविभागांत करुन, त्या त्या वलयवृत्तीनुसार साधना करणे सुलभ जावे म्हणून चातुर्वर्ण्याचे आधारावर समाजाची पुनर्रचना केली. वर्ण आधारावर केलेली मानवी समाजाची रचना म्हणजे चातुर्वर्ण्य रचना होय.
ब्राह्मण
संपादनब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण! जातीने कोणीच ब्राह्मण नसतो कारण जन्मतः सारेच शूद्र असतात, असे स्कंद पुराण सांगते. जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्चते म्हणून वैदिक चातुर्वर्ण्यात जन्मतः कोणीच ब्राम्हण नाही. त्या त्या व्यक्तीच्या गुणकर्मानुसार त्याची जी प्रवृत्ती उत्पन्न होईल, त्या त्या प्रवृत्तीला धरून त्या त्या व्यक्तीच्या वलयाचा वर्ण असेल. शुद्ध सात्विक वृत्तीच्या साधकांचे वलय शुक्ल वर्णाचे असते, म्हणून ब्राह्मण शुक्ल वर्णाचे असतात, असे वेद एवं उपनिषदे सांगतात. पण त्या शुक्ल वर्णाचा अर्थ कातडीचा गोरा वर्ण नसून तेजोवलयाचा आहे. काळ्या रंगाच्या परंतु सात्विक वृत्तीच्या व्यक्तिचे वलय पूर्ण शुक्ल राहू शकतो तर गोऱ्या कातडीच्या व्यक्तीचा वलयवर्ण कृष्ण राहू शकतो. वर्ण व्यवस्था शरीराचे भोवताल पसरलेल्या दिव्य प्रकाश वलयाचे वर्णावर अवलंबून आहे. कातडी वा व्यवसायावर अवलंबून नाही. म्हणून गीता सांगते, चातुर्वर्ण्य मया सृष्टं, गुणकर्म विभागशः वर्णभेदावर चातुर्वर्ण आहे तर वृत्तीनुरुप वर्ण असतो. वृत्तीचा परिणाम माणसाच्या शरीराभोवतालच्या तेजोवलयावर निश्चित होतो. शुक्ल वलयाच्या व्यक्तींची वृत्ति सात्विक, सौम्य एवं आध्यात्मिक असते. असल्या शुक्लवर्णीय तेजोवलयाचे व्यक्तींना चातुर्वर्ण्यात वृत्तीनुसार ब्राह्मणाचे उच्च स्थान दिले. चातुर्वर्ण्यात म्हणूनच ब्राह्मणांना पूजनीय मानले आहे. उच्च वृत्तीचा कोणीही ब्राह्मण बनू शकतो मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. यादृष्टीने गोरा कुंभार, तुकाराम, नामदेव, कबीर ब्राह्मणच होत.
क्षत्रिय
संपादनज्यांची वृत्ति झुंझार व आक्रमक असते, अशांच्या तेजोवलयाचा वर्ण लाल असतो. असली लाल तेजोवलये ज्यांची ज्यांची असतील त्या सर्वांना चातुर्वर्ण्यात क्षत्रियाचे स्थान दिले आहे. देशरक्षण करण्यास असल्या आक्रमक वृत्तींच्या लोकांची आवश्यकता असतेच म्हणून लाल वर्णाच्या लोकांना क्षत्रिय संबोधून त्यांना देशरक्षणाचे, वृत्तीरक्षणाचे कार्य दिले. ही तेजोवलये पाहण्याकरिता कठीण साधना करावी लागते. सामान्य माणसाला ही तेजोवलये दिसत नाहीत; त्यामुळे ती नाहीत, असे सामान्य माणूस मानू शकतो. लाल कातडीचा नव्हे तर लाल तेजोवलयाचा माणूस चातुर्वर्ण्यात क्षत्रिय मानला आहे.
वैश्य
संपादनवेद उपनिषदांत वैश्यांचा वर्ण पीत सांगितला आहे. ज्यांची वृत्ती आपल्यालाच लाभ मिळावा, अशी असते त्यांच्या त्या वृत्तीनुसार त्यांच्या वलयाचा वर्ण पीत असतो. त्यामुळे तो वैश्य! वैश्य वृत्ती असते आणि वृत्तीनुसार व्यक्ति कर्म करीत असते. म्हणून वैदिक परंपरेत लाभसमयी शुभसमयी पीतवस्त्र वापरतात. जसे लग्न प्रसंगी, भौतिक साधनेच्यावेळी पीत वस्र वा रंग वापरतात. पीत वृत्तीचे ते वैश्य होत. यांत कातडीचा कोणताच संबंध नाही.
शुद्र
संपादनशुद्रवृत्तीचा, वरुन कितीही उत्तम राहणीचा असो, वर्गवारी शुद्रांतच होईल, वृत्तीच शुद्राची असते. दिखाऊ, भंपक माणसे वृत्तीने शूद्र असल्यामुळे, त्यांच्या त्या कृष्ण वृत्तीचा, त्यांचे तेजोवलयावर परिणाम होऊन, त्यांच्या वलयानुसार त्यांना कृष्णवर्णीय मानण्यांत आले. अनार्याच्या वर्णाशी चातुर्वर्ण्यातील शुद्रवर्णाचा सुतराम संबंध नाही. हे शास्त्र न समजता कथित विद्वानांनी चातुर्वर्ण्याचे चुकीचे अर्थ सांगून वैदिक समाजांत फूट पाडणे केले आहे. वर्णाचा संदर्भ वृत्तींशी असल्यामुळे, वृत्ती बदलल्यास वर्णही बदलू शकतो.