घनगड हा किल्ला मुळशी / ताम्हिणी जवळ पुणे जिल्ह्यात आहे. इगतपुरी फार लांब आहे तिथून. आपली काही हरकत नसल्यास मी बरोबर माहिती टाकू इछितो.


के.देवदत्तांनी वर जे लिहिले आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. हा संपूर्ण लेख माझ्या मते घारगड या किल्ल्यासंबंधी आहे. सरज्या यांनी लिहिलेल्या या मुळच्या लेखात MvKulakrni, अभय नातू वगैरेंनी भर टाकली आहे, ती कशाचा आधारावर ते समजत नाही. लेखाच्या तळाशी Sagar Shivade यांनी त्यांच्या एका लेखाचा दुवा दिला आहे. त्या दुव्यावरच्या ’त्या’ असली ’घनगड’ विषयक लेखातील मजकुराचे या तोतया घनगड लेखातील मजकुराचे अजिबात साधर्म्य नाही. त्यामुळे विकीवरील हा लेख नावासकट पूर्णपणे रद्द करावा; मात्र त्यापूर्वी त्यातला मजकूर घारगड या मथळ्याखाली प्रकाशित करावा. त्यानंतरच लोणावळ्यापासून जवळ असलेल्या मुळशी तालुक्यातल्या घनगडाविषयी एक वेगळा लेख लिहिणे शक्य होईल.

महाराष्ट्रातील किल्ले या लेखातही घनगडचा समावेश नाशिक जिल्ह्यात केला आहे, तो अर्थात चुकीचा असावा. तेथे घारगड अशी दुरुस्ती करून घनगड हे नाव पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांच्या यादीत जायला हवे.

....J (चर्चा) १७:०७, ६ फेब्रुवारी २०१५ (IST)Reply

"घनगड" पानाकडे परत चला.