मुख्य पानावरुन हलविलेला मजकूर संपादन

   लिबांचीवाडी :- सह्याद्रीच्या हृदयात(कुशीत )वसलेलं शंभूमहादेवाच्या रांगेत दडलेलं 
      श्री मांढरदेवी  काळुबाईच्या  कृपाछायेत पहुडलेलं
      कर्दनकाळ असणा-या काळ्या कडयाच्या कपा-यांशी झुंज देणारे
      हिंमतवानांची हिंमत, एकमेकांची नाती अन् ऐक्याचा अविष्कार जपणारे
      डोंगर पायथ्याशी हडप्पा संस्कृतीचा वसा घेतलेलं एक टुमदार आकर्षक खेडे म्हणजेच 
                 लिंबाचीवाडी.                                
      गावाचे रचनाकार , सर्व कलागुण संपन्न, गावाचे निर्माते सर्वेसर्वा 
               कै. लक्ष्मणराव मांढरे यांच्या कर्तव्याने , 
               कै. हरीबा मांढरे यांच्या संकल्पनेतून,
              कै..दौलतराव कासुर्डे , कै कोंडीबा कासुर्डे, 
                कै.गेनबा मांढरे यांच्या सहकार्याने
       या गावाची झगलवाडी गावातून स्वतंत्र निर्मिती झाली.
      मांढरे वस्ती ,कासुर्डे वस्ती ,हजारे वाडा आणि धनगर वाडा यांच्या  
           एकत्रीकरणातून निर्माण झालेले  हे गाव       
    मांढरदेवी,कन्हेरी ,झगलवाडी आणि लोहोम यांच्या  सीमेलगत असणारे हे  गावे 
      स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी तयार झालेले हे  चिमुकल गाव 
      जलतरण  अन दशक्रिया विधीस उपयुक्त असणारी  पूर्वेकडील सार्वजनिक विहीर 
      आणि पश्चिमेस असणारे  दत्तमंदिर म्हणजे गावचे मंगलमय प्रवेशद्वार 
      चौफेर  असणारी काळूबाई ,सिरसाई, लक्ष्मी मातेची मंदिरे  ही तर  
                गावची  दैव रूपातील कवचकुंडले                    
      काळूबाई, मंडाईमातेच्या हृदयातून निघणा-या या प्रवाहाच्या कडेलगत असणारे 
      हे सुंदर चिमुकल गाव अशा  या गावची रचनाच 
      सर्वांना  भुरळ घालणारी  आयताकृती,
      प्रत्येकाच्या  घरासमोर २० ते ३० फुट रुंदीचे रस्ते,झाडांना पार,                                
              गटराची सुविधा असणारे गाव . 
     गावात शिक्षक,डॉक्टर,इंजिनीअर,कंपनी कर्मचारी,कॅप्टन,सुपरवायझर, 
    अ.सि.पी., लेफ्नंट, पी.आय.वर्कशॉप  मालक आणि विमानतळ कर्मचारी
            अशा विविध पदांवर   अनेक   व्यक्ती आहेत.   
                       अशाप्रकारे 
      काळूबाईच्या शिखरावर नव्हे तर संपूर्ण जगतात ,
      विविध क्षेत्रात झेपावू पाहणार हे  विकसित गाव.
      खेळाडूंचे गाव , कुस्तीगीरांच गाव बुद्धिवंताच अन् पदवीधरांच गाव 
      ग्रामस्वच्छता अभियान ,निर्मलग्राम  अभियानात  खंडाळा तालुक्यात 
              सर्वात अगोदर प्रथम क्रमांक  मिळविणारे  गाव ,
        संतुलित पर्यावरणाचा  ध्यास घेतलेलं हे  विकसित  गाव   
     काळूबाईदेवी  सेवा,नेहरू युवा अन गुरुदेव दत्त सेवा ही तर गावच्या 
                प्रत्येक कार्यात अग्रेसर असणारी मंडळे
   आंब्याच्या  झाडाखालून मिळणा-या  स्वच्छ  निर्मळ  झ-याच्या थंडगार पाण्याचा 
            सतत वर्षभर वापर करणार गाव  
      नैसर्गिक साधन संपत्तीचा आवशकतेनुसार अन सौरउर्जेचा जास्तीत जास्त
            उपयोग करण्याचा प्रयत्न करणार हे गाव 
   हिरडा ,बेहडा,साग,बाभूळ ,कडूनिंब, चंदन या सारख्या सदाहरित तसेच पानझडी वृक्षांच्या 
                वनराईने  नटलेlaला परिसर असणार   
     शेतीतील माती परीक्षण  करून सीताफळ ,भात ,बाजरी ,ज्वारी ,गहू ,हरभरा याचं 
                   उत्पादन घेणार माझ गाव 
     करवंदी ,आंबा,  फणस, जांभूळ,  बोरे  तसेच  आवळा  या  सारखा 
                 रानमेवा  चाखणार. माझं  गाव.
    वृक्षारोपण करून  वृक्षसंवर्धन  आणि जतन  करणार  अन इतरांना  प्रवृत्त   करणार   
                               हे गाव 
                 लिंबाच्या झाडाखाली
          मुळे खोड यातून तयार झालेलं लक्ष्मीचे
     वैशिष्ट्येपूर्ण मंदिर म्हणजे गावच गावपण अन् नावपण
     आणि म्हणून कुस्ती ,खेळ  आणि  शिक्षण या मध्ये गावासाठी ,
           गावच्या नावासाठी             कायपण ? असे हे सुंदर संपन्न गाव
"खंडाळा (पुणे)" पानाकडे परत चला.