चर्चा:कृष्णाजी केशव दामले
केशवसुत-कृष्णाजी केशव दामले
मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी!
आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून केशवसुतांचे नाव घेतले जाते. त्यापूर्वी अध्यात्मात अडकून पडलेल्या, पौराणिक कथा -आख्यानांत रंगून जाणार्या मराठी कवितेला त्यांनीच प्रथम सर्वसामान्य माणसांच्या जगात आणले. चाकोरीबद्ध कवितेला स्वच्छंद, मुक्त रूप दिले. सर्वसामान्य माणसांची सु्खदु:खे, भावभावना, वासना-विकार यांना कवितेत मानाचे, जिव्हाळ्याचे स्थान दिले; कवितेला वास्तवतेचे भान दिले.
इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.
त्यांच्या एकूण फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यातून त्यांनी तोपर्यंत मराठीत कधीही न हाताळले गेलेले विषय- व्यक्तिगत स्नेहसंबंध, स्त्रीपुरुषांमधील प्रेमभावना, कवी व कवित्व, सामाजिक बंडखोरी, उदारमतवाद, मानवतावाद, राष्ट्रीय भावना, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, निसर्ग हे विषय- हाताळलेले दिसतात. ही स्वच्छंदतावादी मनोवृत्ती काव्यातून प्रथमत:च व्यक्त होत असल्याने त्यांच्या कविता संख्येने कमी असल्या, तरीही क्रांतिकारक व प्रवर्तक ठरल्या. आज (वर उल्लेख केलेल्या) अनेक विषयांशी संबंधित कवितांचे प्रवाह मराठी साहित्यात दिसतात. या सर्व प्रवाहांचा मूळ स्रोत म्हणजे केशवसुतांची कविता होय.
आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. त्यातही त्यांची तुतारी ही कविता क्रांतिकारक ठरली. या कवितेच्या नावावरून तेव्हा तुतारी मंडळ स्थापन झाले होते. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे नावाजलेले कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.
त्यांच्या कवितांमधून सामाजिक दु:ख, अन्याय, विषमता, अंधश्रद्धा हे विषय जसे आले, तसेच त्यांच्या कवितांमध्ये प्रेमभावनेचा प्रांजळ व नितळ अविष्कारही आलेला दिसतो. उदा. आपल्या पतीचे कुशल विचारणार्या पत्नीला ते म्हणतात ;
करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.
किंवा
आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात; श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते, प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते, कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे, डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.
अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.
काव्यविषयक दृष्टीकोन, कवितेचा आशय, तिचा अविष्कार या सार्याच बाबतीत क्रांती घडवणार्या , कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले हे मराठी साहित्याचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
त्या काळात राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक; सामाजिक क्षेत्रात आगरकर ज्या तर्हेने भूमिका पार पाडत होते, तशीच भूमिका मराठी कवितेच्या क्षेत्रात केशवसुत यांनी यशस्वीपणे पार पाडली, असे निश्चितपणे म्हणता येईल.
इतर पानावरुन इंग्लिश मजकूर
संपादनKrishnaji Keshav Damle alias Keshavsut An epoch making poet who infused a different style in essence, expression and poetic deliberation
Birth: 7 October 1866
Keshavsut is considered to be the father of modern Marathi Poetry. It was he who first brought poetry into the life of common Marathi man. Until then, poetry was confined mostly to religion, spirituality and folk legends. He gave a free, spontaneous form to poetry, which was otherwise always constricted to established form. He gave poetic expression to the common man’s joys and sorrows, emotions, desires and disease. He brought realism into poetry.
He brought passionate individualism, personal awareness and aesthetism as seen in English romantic poetry into Marathi poetry. He believes that poetic inspiration is an independent and vibrant energy, and that nobody should try to restrict or mould it in any particular way. He was highly influenced by the poetry of English poets like Wordsworth, Shelly, Keats. Keshavsut brought the Sonnet, a popular form seen in English poetry, into Marathi poetry, naming it Suneet.
Only 135 of his poems are available today. He has handled such subjects in his poems, which were not seen previously like, personal relationships, romance, poets and poetry, social rebellion, open-mindedness, humanism, nationalism, expression of mystical experiences and nature. As this free form of poetry was being expressed for the first time, his poems, although few in number, proved to be revolutionary as well as provoking. Various streams are seen in Marathi literature today and which handle most of the subjects mentioned above. All of these streams have their origin in the poetry of Keshavsut.
His poems Amhi Kon (who are we)?, Nava Shipahi (New soldier), Tutari (Trumpet), Satariche Bol (Musical Notes of a Sitar), Zhapurzha, Haraple Shreya (Lost glory), Murtibhanjan (Breaking/ falling of Idol), Gofan are some of his best creations. Tutari proved to be quite revolutionary, to the extent that a society by the name of Tutari Mandal was established. Illustrious poets like Govindaagraj, Balkavi, Rendalkar, prefer to be called as his pupils.
Just as his poetry handled subjects like social dissatisfaction, injustice, inequality, superstitions, so also did he depict an innocent and untainted, pure expression of love.
For example,
As a husband enquiring about the well-being of his wife, he says:
Kara aapulya tu paha chachpun, ura aapulya paha tapasun Prakruti majihi tithe tuj kalel, vikruti majhi tuj tithe milel.
(Feel your hands, check in your heart, you will also find there, my nature, as well as my perversity)
or
Remembering his home and wife, he says,
Shwaasaani lihili viram disati jyamaji bashpiya te, pritiche barawe samarthan ase sansprutya jyamaji te, Kantechi asali mala pavan ha patre aata detase, dole jhakuni vachita tvarit ti sammrudh mi hotase.
(In which a breath seems to have paused the tears, In which contains the palpable proof of love, The wind brings in the memory of such a letter from my wife, Remembering it I get overwhelmed)
In this way, he has expressed so minutely, his own, unique philosophy of love, for the first time in the history of Marathi literature.
Keshavsut was a poet, who revolutionized everything related to poetry – poet’s perspective, intent and expression. This great poet, who dedicated himself solely for poetry throughout his life, died at a very young age of 39 to the misfortune of Marathi literature.
Keshavsut was a successful revolutionary in poetry in the same parallel as Lokmanya Tilak in politics and Agarkar in socialism.