चर्चा:कार्बन डायॉक्साइड

There are no discussions on this page.

कार्बन डायऑक्साईडचे उपयोग -

१) फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात.

२) स्थायुरूपातील कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फाचा वापर शीतकपाटात पदार्थ थंड करण्यासाठी होतो.

३) अग्निरोधक यंत्रात (fire extinguisher) रासायनिक प्रक्रियेत तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साईडच असतो.

४) कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साईड वापरतात.

५) प्रकाश प्रकाशसंश्लेषण या प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व स्वतःचे अन्न तयार करतात.

६) कार्बन डायऑक्साईडचा उपयोग युरिया, मिथेनॉल, सेंद्रिय व असेंद्रिय कार्बोनेट तयार करण्यासाठी होतो.

७) कार्बन डायऑक्साईड व इपोक्साइड यांच्या संयोगाने प्लास्टिक व पॉलिमर तयार केले जातात.

८) विद्युत उपकरणांची स्वच्छता करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरले जाते.

९) तेलप्रक्रिया उद्योगांमध्ये तेलाची घनता व उत्पादन वाढविण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो.

"कार्बन डायॉक्साइड" पानाकडे परत चला.