हलवलेला मजकूर संपादन

प्रस्तुत लेखाचे विश्वकोशीय ढंगाने पुनर्लेखन करताना आधीच्या आवॄत्तीतील मजकूर येथे हलवत आहे. या मजकुरात वस्तुनिष्ठता सोडून काहीअंशी स्तुतिसुमनात्मक वाटेल/"ललित" छापाच्या विशेषणांनी सजवून लिहिलेला/व्यक्तीविषयीची वस्तुनिष्ठ माहिती देण्याऐवजी व्यक्तीची प्रतिमा उभी करणारा अंश असल्यामुळे त्यातील काही "माहितीपूर्ण" भाग उचलून लेखाचे पुनर्लेखन केले आहे. जुन्या आवॄत्तीतील हलवलेला मजकूर असा :

दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी,त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींकरवी लिहविला.रायगड जिल्ह्यातील शिवथरची घळ या घटनेची साक्ष देत आजही अत्यंत निबीड अरण्यात विसावलेली आहे.श्री कल्याण स्वामी महायोगी होते.ते सर्वाँगाला भस्मलेपन करत असत.दररोज बाराशे सुर्यनमस्कार घालत असल्यामुळे शरीर बलदंड होते.कपाळी आडवा गंध लावत.अंगावरती रूद्राक्षमाला धारण करत.त्यांची जटा व दाढी वाढलेली होती.त्या जटा रूद्राक्षांनी बांधलेल्या दिसतात.ते यज्ञोपवित घालत असत.त्यांच्या दोन्ही करकमलांमध्ये मुद्रीका व कानांमध्ये ठसठशीत कर्णकुंडले आहेत.तसेच ते कधी कधी कौपीन नेसत.कल्याण स्वामी नित्यनेमाने स्नान संध्या करत.प्रंचड आचारशील होते.त्यांनी निद्रेवर विजय मिळवला होता.ते एवढे मोठे अधिकारी सत्पुरूष असूनही अखेरपर्यँत सद्गुरूवचने(मनाचे श्लोक) म्हणत भिक्षा मागत.रामदासी सम्प्रदायामध्ये फारसा उल्लेख नसलेल्या पातंजल योगामध्ये स्वामीँचा मोठा अधिकार होता.समर्थ रामदास स्वामींनि त्यांना निर्विकल्प समाधिचा अनुभव दिला.श्रीसमर्थ रामदास स्वामींनी त्यांचे लाडके शिष्य कल्याण स्वामींना दासबोधाचा अर्थ वा सार सांगितले. ते सार समर्थांनी व कल्याण स्वामींनी ज्या काव्यरचनेतून व्यक्त केले तिला 'सोलीव सुख' असे नाव आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३८, १४ डिसेंबर २०११ (UTC)

"कल्याण स्वामी" पानाकडे परत चला.