चर्चा:कऱ्हाडे ब्राह्मण
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by ज
ज यांचे उत्पाती संपादन
संपादन- सर्वप्रथम नेहमीप्रमाणे ज यांनी अचानक कोणतेही कारण देता या लेखातून एक संपूर्ण परिच्छेद काढून टाकला. या इतिहासात ते स्पष्ट दिसत आहे.
- विनाकारण माहिती उडवल्यामुळे मी तो परतवला होता, ज्यावर ज यांनी (Sureshkhole (चर्चा)यांची शुद्धलेखनाच्या चुका असलेली आवृत्ती 1592515 परतवली.) असे चुकीचे कारण देऊन ती परत एकदा उलटवली.
- ह्या मध्ये एक मुद्दा महत्त्वाचा आहे की, हे माझे लिखाण नाही, दुसरा मुद्दा असा आहे की, शुध्दलेखनाच्या चुकांमुळे आपण संपुर्ण मजकूर काढावा असा कुठेही संकेत नाही. असे असता ज यांनी ते पुर्वपदाला न्यावे अशी विनंती. शिवाय मला हे ही इथे नोंदवायचे आहे की, ज यांनी विनाकारण असा मजकूर उडवण्याची आणि ते लक्षात येण्याची ही पहिली वेळ नाही, त्यांनी अनेकदा असे केले आहे आणि वेळोवेळी मी ते नोंदवले आहे.
WikiSuresh (चर्चा) २२:१३, ६ मे २०१८ (IST)
विषयाला धरून असलेला कोणताही आवश्यक परिच्छेद काढलेला नाही, तरी कोणता परिच्छेद काढला ते सांगावे.
हे तुमचे लिखाण नसेल तर कुणाचे तेही सांगावे, म्हणजे त्याला चुकांची यादी कळवीन.
आता बहुतृक चुका दुरुस्त केल्या आहेत, तेव्हा 'संपूर्ण मजकूर काढला, अशी आवई उठवून निष्कारण गहजब करू नये. ... ज (चर्चा) २२:२८, ६ मे २०१८ (IST)