चर्चा:करदर्शन
कराग्रे वसते लक्ष्मीः करमूले सरस्वती । करमध्ये तू गोविंदः प्रभाते करदर्शनम् ॥
उपरोक्त श्लोक समजून म्हटला तर तो मानवाच्या जीवनात प्रेरणादायक ठरेल. लक्ष्मी, विद्या किंवा भगवान प्राप्त करणे ही मानवाच्या हातातील गोष्ट आहे, असा उत्साही अर्थ ह्या श्लोकात लपलेला आहे. हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आहे असे सांगितले आहे. माणसाचे जवळ जवळ सर्वच उद्योग बोटांच्या अग्रभागाने होतात म्हणून तेथे लक्ष्मीचा वास आहे असे सांगितले आहे. हाताच्या मूळ भागात सरस्वती म्हणजे विद्या आहे. सरस्वती मूळात आहे ह्याचा अर्थ कोणत्याही कार्याच्या पायात ज्ञान असले पाहिजे. खऱ्या ज्ञानाशिवाय संपत्ती किंवा परमेश्वर काहीच मिळत नाही. मानवाला वित्त किंवा विद्या ह्यांची नशा चढते. तो उन्मत्त बनतो. हाताच्या मध्यभागात गोविंद वसतो असे सांगून लक्ष्मी आणि सरस्वती मध्ये आपल्या शास्त्रकारांनी समन्वय साधला आहे. भगवंताच्या उपस्थितीमुळे माणसाला वित्तमद किंवा विद्यामद चढत नाही. रावणाच्या जीवनात भगवान नसल्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही असूनही त्याचे जीवन दैवी न बनता राक्षसी बनले. आपल्या हाताची सर्व बोटे असमान आहेत, पण त्यांना जर हाताच्या मध्यभागी आणले तर समान भासतात. त्याचप्रमाणे समाजात असमानता निर्माण करणाऱ्या लक्ष्मीला आणि सरस्वतीला जर प्रभु बरोबर जोडण्यात आले तर त्या समानता निर्माण करतात. शिवाय हातात भगवंताचा वास असल्यामुळे भगवंताला आवडणार नाही असे एकही कार्य न करता, रोज मी केवळ सत्कर्मच करीन असा विचार सकाळी केला पाहिजे.
Start a discussion about करदर्शन
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve करदर्शन.