चर्चा:उत्तर भारत पूर, जून २०१३

वर्गीकरण संपादन

वर्ग:भविष्यात विकिन्यूज मध्ये स्थानांतरीत करावयाचे लेख हा वर्ग या लेखात टाकण्यामागील भूमिका काय आहे?
हा लेख स्वतंत्ररित्या मराठी विकिपीडियावर असण्याइतका उल्लेखनीय आहे, असे मला वाटते.
विकिन्यूजवर त्याचा उल्लेख असावा, मात्र हा लेखही असावा. म्हणूनच मी हा वर्ग काढला होता.
क्षितिज पाडळकर (चर्चा) १२:१६, २६ जून २०१३ (IST)Reply


क्षमा असावी, मागच्या वेळी वर्ग टाकताना तो जतन झाला नाही असे मला वाटले होते म्हणून चर्चे शिवाय पुन्हा टाकला गेला.प्रत्यक्ष दिसणारे वर्गीकरण नको असेलतर न दिसणारे वर्गीकरणातही टाकावयास हरकत नाही.एनी वे, अशा विषयास ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असू शकते का ? होय असू शकते.हि सीमा रेषा बऱ्याचदा पुसट असते.
लेखाच सध्याच स्वरूप बातमीची बातमी देणारं, वार्तांकनाच आहे. लेखात अलिकडील लक्षवेधी घटनांचे तुलनात्मक महत्व जास्त अधोरेखीत करणारी विपी:वर्तमानता आहे.लेखातील माहितीस (घटनेस नव्हे) अद्याप ज्ञानकोशाची गरज असलेली दूरगामी अथवा ऐतिहासिक परिपेक्ष आणि धाटणी, सर्वसमावेशकता, खोली/प्रगल्भता लाभल्याचे वाटत नाही.अशाच स्वरूपाच्या बातम्यांच्या लेखांचे मराठी विकिपीडियावरील लेखन वाढल्या नंतर कदाचित मी काय म्हणू पहातो आहे हे आपल्या आपसुकच लक्षात येईल.
किंवा उत्तर भारतातील अतीवृष्टी आणि पूर असा व्यापक लेख विषय लक्षात घ्या आणि तूलना करा.सध्याच्या हानीची स्वत:ची उल्लेखनीयता नाही अस नाही.पण उत्तर भारतात वर्षातून साधारणत: दोनदा पूर परिस्थिती उद्भवणे सामान्य बाब आहे हे लक्षात घेतल्यास या विशीष्ट घटनेचा ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेला वेगळेपणा लेखात अधोरेखीत होतो आहे असे वाटते नाहीए.
  • जून २०१३ मध्ये उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. मोठ्या प्रमाणात म्हणजे नेहमीपेक्षा नेमका किती जास्त ?
  • त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले.
नेमकी काहीच माहिती नाही. चक्क सर्वसाधारण बातमीदाराची वार्तांकनता आहे.
  • हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यांतील काही भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.
पुन्हा एकदा सर्वसाधारण बातमीतल वाक्य आहे .काही भागात म्हणजे सर्व भागात नव्हे, पावसाळ्यात मोठा पाऊसही येतच असतो, मोठ्या प्रमाणात पाऊस पडला या वाक्यात ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असणारे काही वेगळेपण अधोरेखीत होते आहे असे वाटत नाहीए.
याचा अर्थ हा विषय विकिपीडियाने कव्हर करू नये असा नाही.उलट अशा कव्हरेजच्या प्रयत्नाकरीता अभिनंदन.'केवळ बातमी' आणि ज्ञानकोश यातील रेषा पुसट असली तरी ज्ञानकोशाकरता महत्वाची आहे.आणि ज्ञानकोशीय द्र्ष्टीकोनातून लेखाचा कस लागणे अद्याप बाकी आहे असे माझे व्यक्तीगत मत आहे. फेसबूक ग्रूप मध्ये मागे केव्हातरी या विषयावर मी मागे केव्हातरी चर्चा केली आहे,वापस शोधून ती नंतर सवडी नुसार आपणास उपलब्ध करेन.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२५, २६ जून २०१३ (IST)Reply
"उत्तर भारत पूर, जून २०१३" पानाकडे परत चला.