महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे आंबील तयार केली केली जाते.विदर्भातील काही भागात.आंबील तयार करण्यासाठी ज्वारीची भरड काही तास ताकात भिजवून ठेवली जाते. त्यानंतर फोडणी तयार करुन त्यात हे मिश्रण घालून घट्ट होई पर्यंत शिजवले जाते. फोडणीसाठी गोडलिंबाची पानं, मोहरी,जिरे,हळद,सुक्या खोब्राचे तुकडे,शेंगदाणे,चवीपुरता गुळ,मीठ घातले जाते.आंबिलचा हा प्रकारही खूप चविष्ट लागतो.

"आंबील" पानाकडे परत चला.