(मुळ लेखातील मजकूर येथे हलविला) आंबटचुक्याची भाजी लागणारा वेळ: २० मिनिटे वाढणी/प्रमाण: ३-४ व्यक्ती लागणारे जिन्नस: आंबटचुक्याची एक जुडी मूठभर हरबरा डाळ (किंवा तुरीची आणि हरबऱ्याची निम्मी निम्मी) मूठभर शेंगदाणे १-२ लहान चमचे दाण्याचा कूट गुळाचा लहान खडा लाल तिखट मीठ गोडा मसाला लसूण-खोबऱ्याचा छोटा गोळा फोडणीसाठी - तेल, कढीलिंब, हिंग, जिरे, मोहरी, हळद, हिंग पाणी लागेल तसे भाजी निवडून, धुऊन, चिरून घ्यावी. डाळ धुऊन घ्यावी. कुकरला डाळ(किंवा डाळी), दाणे, भाजी आणि थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे. शिजलेली भाजी नीट घोटून घ्यावी. उभ्या पातेल्यात तेलाची फोडणी करून घ्यावी. त्यात लसूण-खोबऱ्याचा गोळा घालावा. वर घोटलेली भाजी घालावी. मीठ, तिखट, मसाला आणि थोडे पाणी घालून मस्त उकळी काढावी. शेवटी गूळ आणि दाण्याचा कूट घालून परत एक उकळी आणावी. भाकरी, चपाती, भात कशाहीबरोबर मस्तच लागते.

Start a discussion about आंबट चुका

Start a discussion
"आंबट चुका" पानाकडे परत चला.