चर्चा:अभिमन्यु
’परंतु’चा अपवाद वगळता, मराठीत ऱ्हस्व उकारान्त शब्द नाहीत. अभिमन्यू हा शब्द जर मराठी असेल तर ’न्यू’ दीर्घ पाहिजे. कुणीतरी अभिमन्यू हा शब्द बदलवून अभिमन्यु केला आहे. तो तातडीने दुरुस्त करायला हवा. संदर्भ : http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=4294%3A2010-12-24-05-11-45&catid=1&Itemid=2
अर्जुन : पाच पांडवांपैकी तिसरा पांडव. पांडुपत्नी कुंतीस इंद्रापासून झालेला पुत्र. धनंजय, इंद्रसुत, फाल्गुन इ. नावे त्याला आहेत. द्रोणाचार्यांचा तो पट्टशिष्य होता. त्याला शंकरापासून पाशुपतास्त्र, परशुरामापासून शस्त्रविद्या व अग्नीकडून ‘गांडीव’ धनुष्य तसेच इंद्र, वरुण, यम व कुबेर यांच्यापासून विशिष्ट शस्त्रांची प्राप्ती झाली होती. भारतीय युद्धारंभी विषण्णावस्थेतील अर्जुनास सारथी कृष्णाने गीता सांगितली व युद्धप्रवृत्त केले. नर-नारायणांपैकी त्याला नराचा अवतार मानतात. द्रौपदी, सुभद्रा, चित्रांगदा व उलूपी ह्या चार पत्न्यांपासून त्याला अनुक्रमे श्रुतकीर्ती, अभिमन्यू, बभ्रुवाहन व इरावान हे पुत्र झाले. भारतीय युद्धात कर्ण, जयद्रथ, भीष्मादी कौरववीरांना त्याने मारले. हा पांडवांसोबत महाप्रस्थान करीत असता मरण पावला.....J (चर्चा) २०:५८, ३० ऑगस्ट २०१३ (IST)