चर्चा:अग्नी (देवता)

Active discussions

विविध कर्मविशेष अग्नींची नांवेसंपादन करा

लौकिक कार्यांमध्यें पावक नांवाचा अग्नि आहे.

गर्भाधानसंस्कारामध्यें मारुत नांवाचा अग्नि आहे.

पुंसवनसंस्कारामध्यें पवमान नांवाचा अग्नि आहे.

शुभकार्यांमध्यें शोभन नांवाचा अग्नि.

सीमंतोन्नयनामध्यें मंगल नांवाचा अग्नि.

जातकर्मामध्यें प्रबल नांवाचा अग्नि.

नामकरणामध्यें पार्थिव नांवाचा अग्नि.

अन्नप्राशनामध्यें शुचि नांवाचाअग्नि.

चूडाकर्मामध्यें सभ्य नांवाचा अग्नि.

उपनयनांत समुद्भव नांवाचा अग्नि.

गोदानामध्यें सूर्य नांवाचा अग्नि.

विवाहामध्यें योजक नांवाचा अग्नि.

आवसथ्यामध्यें म्हणजे नांवाचा अग्नि.

अग्रिहोत्रांत द्विज नांवाचा अग्नि.

वैश्वदेवांत रुक्मक नांवाचा अग्नि.

प्रायश्चित्तांत विट नांवाचा अग्नि.

स्वयंपाकात पावक नांवाचा अग्नि.

देवकार्यांत हव्यवाह नांवाचा अग्नि.

पितृकार्यांत कव्यवाहन नांवाचा अग्नि.

शांतिककार्यांत वरद नांवाचा अग्नि.

पौष्टिककार्यांत बलवर्धननांवाचा अग्नि.

पूर्णाहुतींत मृड नांवाचा अग्नि.

जारणमारण क्रियेत क्रोध नांवाचा अग्नि.

वशीकरण कार्यांत कामद नांवाचा अग्नि.

अरण्य जाळण्याचे कार्यांत दूषक नांवाचा अग्नि.

पोटांत जठर नांवाचा अग्नि.

मेलेल्याचा दाह करण्यांत क्रव्याद नांवाचा अग्नि.

लक्षहोम करण्यांत वह्नि नांवाचा अग्नि.

कोटी होम करण्यांत हुताशन नांवाचा अग्नि.

वृषोत्सर्ग करण्यात अध्वर नांवाचा अग्नि.

सुचयांत ब्राह्मण नांवाचा अग्नि.

समुद्रांत वाडाव नांवाचा अग्नि.

प्रळयकाळीं संवर्तक नांवाचा अग्नि.

गार्हपत्य हा ब्रह्मा नांवाचा अग्नि.

दक्षिण हा ईश्वर नांवाचा अग्नि.

आहवनीय हा विष्णु नांवाचा अग्नि. असे हे तीन अग्नि अग्निहोत्रामध्यें आहेत.

अशा रीतीनें हीं अग्नींची नांवें जाणून गृह्यकर्म करीत जावें. ही सर्व नामें सर्व प्रकारच्या संस्कारांत असणाऱ्या शांतिक आणि पौष्टिक इत्यादि अनुष्ठान करण्याकरितां उपयोगीं पडणारीं आहेत म्हणून त्या त्या कामामध्यें त्यांची योजना करावी.

"अग्नी (देवता)" पानाकडे परत चला.