चर्चा:अंकशास्त्र

Add topic
There are no discussions on this page.

मोल्सवर्थ इंग्रजी-मराठी शब्दकोषात थियरीसाठी उपपत्ती हा शब्द दिलेला आहे.

१.थिअरीसाठी मराठीत सिद्धान्त हा रूढ शब्द आहे. तो समजा चुकीचा असला तरी आता इतक्या वर्षांनी बदलण्याचे काही कारण नाही.

२.महाराष्ट्र शासनाच्या भौतिक परिभाषा कोशात थिअरीसाठी सिद्धान्त हा एकमेव शब्द दिला आहे. उदा० अणु सिद्धान्त, अद्वैत सिद्धान्त, कर्म सिद्धान्त या शब्दांतील अर्थ.

३. थिऑरिटिकलसाठी सैद्धान्तिक. थिऑरिस्टसाठीसुद्धा सैद्धांतिक व उपपत्तिकार. थिऑरिटिकली= सिद्धान्तत:, तत्त्वत:, औपपत्तिक दृष्टीने.

४.. थिऑरिटिकलसाठी व्यवहारातला सोपा शब्द पुस्तकी.

५. प्रवाद म्हणजे समाजात पसरलेला गैरसमज. हा शब्द थिअरीसाठी पूर्णत: अयोग्य आणि म्हणून त्याज्य आहे.

६. महाराष्ट्र सरकारच्या शासन व्यवहार कोशात : थिअरी=वाद, तत्त्व, सिद्धान्त, उपपत्ती. थिअरम=प्रमेय. थिऑरिटिकल= सैद्धान्तिक, तात्त्विक, औपपत्तिक. तेव्हा सिद्धान्तिकी म्हणजे सैद्धान्तिक(थिऑरिस्ट) असण्याचा भाव(गुणधर्म).

तात्पर्य हे की नंबर थिअरीला कुठल्याही कोशात दिला असला तरी, अंक सैद्धान्तिकी हा शब्द सर्वथा अनुचित आहे.....J (चर्चा) २३:२५, १८ मार्च २०१२ (IST)

"अंकशास्त्र" पानाकडे परत चला.