चमकी
चमकी हा स्त्रियांचा नाकाच्या पाळीवर घालण्याचा गोलाकार किंवा फुलाच्या आकाराचा लहानसा दागिना आहे. त्यासाठी नाकपुडीला एक लहानसे छिद्र पाडून तिच्यात ही चमकी बसवून वाटल्यास फिरकीने घट्ट करतात. लहान मुलीपासून ते मोठ्या स्त्रियांपर्यंत सर्वचजण चमकी वापरू शकतात. चमकी ही सोन्याची, चांदीची, हिऱ्याची, मूल्यवान खड्याची किंवा मोत्याची असते.
चमकी घातली की नथ घालता येत नाही, त्यामुळे घरंदाज मराठी स्त्रिया चमकी घालत नाहीत. महाराष्ट्रातल्या लहान मुली बहुधा सुंकली (सोन्याचे नाजूक कडे) घालतात.चमकी ही स्त्रिया रोजच परिधान करतात.हा दागिना बारीक असतो.चमकी ही खाड्यानमधे असते चमकी गोल ही असते.