चतरंग
चतरंग किंवा चतुरंग हा एक भारतीय उपशास्त्रीय संगीतातील वैशिष्ट्यपूर्ण असा गीतप्रकार आहे.
उगम
संपादनरचनेची वैशिष्ट्ये
संपादनचतरंगमध्ये नावाप्रमाणे चार अंग असतात. यात काव्य, सरगम, तराणा आणि तबल्याचे किंवा पखवाजाचे बोल हे चारही प्रकार एकत्र असतात.
चतरंगाची गीताची सुरुवात चिजेच्या शब्दांनी म्हणजे काव्याने केली जाते. त्यानंतर सरगम गायली जाते. नंतर तराण्याच्या बोलाची ओळ आणि त्यानंतर मृदंग किंवा तबल्याचे बोल अशा क्रमाने चतरंगची निर्मिती होते. अशा प्रकारे चार गीतप्रकारांचा समन्वय चतरंगमध्ये साधला जातो. चतरंगमध्ये अस्ताई आणि अंतरा असे दोन भाग असतात. छोट्या ख्यालाच्या अंगाप्रमाणे चतरंग सर्वसाधारणपणे त्रिताल या तालात गायिले जाते. चतरंगची शेवटची ओळ अनेक वेळा उपदेश सांगणाऱ्या काव्याची असते किंवा एखादी उपदेश असणारी प्रचलित म्हण असते.