चची भाषा
चची भाषा महाराष्ट्रातील बालगोपाळांमध्ये एक सांकेतिक भाषा (कोड लॅंग्वेज) म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वसाधारणपणे शालेय विद्यार्थी विविध खेळ खेळताना या भाषेचा सांकेतिक भाषा भरपूर वापर करतात. तशी ही भाषा समजण्यासाठी सोपी असली, तरी सहज बोलण्या/समजण्यासाठी मात्र बराच सराव करावा लागतो. कित्त्येक लहान मुला-मुलींचे गट या भाषेत थोडेफार बदल करून स्वतःची सांकेतिक भाषाही बनवतात!
=चच्या भाषेचे नियम
संपादनचच्या भाषेचे सर्वसाधारण नियम खालीलप्रमाणे आहेत.
- चच्या भाषेमध्ये प्रत्येक शब्द चपासून चालू होतो.
- शब्दातील पहिले अक्षर सर्वात शेवटी म्हणले जाते आणि इतर अक्षरे जशास तसे म्हटली जातात.
काही वेळा पहिला च हा शब्दाच्या पहिल्या अक्षरासारखा चालवला जातो.
- उदा: दिवस = चवसदि
काही उदाहरणे
संपादन- तुझे नाव काय?
- चझेतु चवना चयका?
- आपण एक नवीन योजनेचा वापर करू!
- चपणआ चकए चवीनन चजनेचायो चपरवा चरूक!
बाह्य दुवा
संपादनचशाषास्त्रभा[permanent dead link]काय करत आहे