चक्र (योग)
चक्र ही एक योगविषयक संकल्पना आहे. ही चक्रे आपल्या शरिरातील निरनिराळी कार्ये नियंत्रित करतात असे मानले जाते.
चक्रांची संख्या
संपादनतंत्रशास्त्रात सात चक्रे मानली जातात. परंतु गूढवादाच्या अभ्यासकांनी बारा चक्रे असल्याचे नमूद केले आहे. [१]
एकूण बारा मुख्य चक्रे आपल्या (सूक्ष्म) शरीरात असतात असे मानले गेले आहे.
षटचक्रे
संपादनमानवी शरीरात पाठीच्या कण्यात सुषुम्नानाडीच्या मार्गावर ही चक्रे असतात. ही चक्रे म्हणजे ज्ञानतंतूंची कमले असतात. कुंडलिनी शक्ति त्यांचा भेद करून ब्रह्मरंध्रातून सहस्त्रदलांत विलीन होते व त्यावेळीं योगीं ब्रह्मस्वरूप होतो. कुंडलिनी ह्या चक्रांजवळ आली म्हणजे तीं उमलतात स्पष्ट होतात, असे म्हणतात. ह्या चक्रांचे कुंडलिनी भेदन करते तेव्हां योग्याला अनेक सिद्धि आणि अतींद्रियज्ञान ही प्राप्त होतात. [२]
क्र. | चक्राचे नाव | स्थान | रंग | बीजचिन्हे | देवता | ग्रंथी/गाठी | धातू |
---|---|---|---|---|---|---|---|
१. | मूलाधार किंवा आधारचक्र | शिश्न व गुद यांच्या शिवणीजवळ मागें-पाठीच्या कण्यांत | रंग तांबडा | ह्याच्या चार पाकळ्या असून त्या प्रत्येकीवर अनुक्रमे वं, शं, षं, सं हीं बीजचिन्हे आहेत.
मंद वैराग्य असलेल्या साधकाचा समाधी साधण्याच्या मार्गाची सुरुवात या चक्रापासून होते तेव्हा त्यास पिपीलिका (मुंगी) मार्ग असे म्हणले जाते. |
गणपति | - | अस्थी (Bone) |
पृथ्वी-केंद्र | शारीरिक चेतनेशी संबंधित | ||||||
२. | स्वाधिष्ठान किंवा लिंगचक्र | लिंगाच्या मागें पाठींच्या कण्यात | रंग पिवळा | ह्याच्या सहा पाकळ्या असून त्यांवर अनुक्रमे बं, भं, मं, यं, रं, लं, ही बीजचिन्हे आहेत. | ब्रह्मदेव | ब्रह्मग्रंथी | मेद (Fat) |
आप(जल)-केंद्र | कनिष्ठ प्राणिक चेतनेशी संबंधित | ||||||
३. | मणिपुरचक्र किंवा नाभिचक्र | नाभीच्या (बेंबीच्या) मागे पाठीच्या कण्यांत | रंग निळा | ह्याच्या दहा पाकळ्या असून त्यांवर अनुक्रमे डं, ढं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं, फं, हीं बीजचिन्हे आहेत. | विष्णू | विष्णुग्रंथी | मांस (Flesh) |
अग्नी-तत्त्व | वरिष्ठ प्राणिक चेतनेशी संबंधित | ||||||
४. | अनाहतचक्र किंवा हृदयकमल | हृदयाच्या मागे पाठीच्या कण्यात | रंग शुभ्र पांढरा | ह्याच्या बारा पाकळ्या असून त्यांवर अनुक्रमे कं, खं, गं, घं, ङ, चं, छं, जं, झं, जं, टं, ठं, हीं बीजचिन्हे आहेत.
कुंडलिनी जागृत होऊन येथे आली असता काही ध्वनी ऐकू येतात त्यांना अनाहत ध्वनी म्हणतात. चिणी, चिणिचिणि, घंटा, शंख, तंत्री, ताल, वेणु, मृदुंग, भेरी, व मेघ. - हंसोपनिषद |
शंकर | रुद्रग्रंथी | रक्त (Blood) |
वायू तत्त्व | वरिष्ठ भावनात्मक पुरुषाशी संबंधित | ||||||
५. | विशुद्धचक्र | कंठाच्या मागें पाठीच्या कण्यांत | रंग धुरासारखा | ह्याच्या सोळा पाकळ्या असून त्यांवर अनुक्रमें अं, आं, इं, ईं, उं, ऊं, ऋ, ऋ, लृ, लृ, एं, ऐं, ओं, औं, अं, अः हीं बीजचिन्हे आहेत. | जीवात्मा | - | त्वचा (skin) |
आकाश तत्त्व [१] | वाणीशी संबंधित | ||||||
६. | आज्ञाचक्र किंवा अग्निचक्र | दोन भुवयांमध्ये (त्यामागे पाठीच्या कण्यांत) | विद्युतवर्ण | ह्याला दोन पाकळ्या असून त्यांवर अनुक्रमे हं, क्षं, हीं बीजचिन्हे आहेत.
कुंडलिनी जागृत होऊन येथे आली असता, तिला आत्मरूपाचे दर्शन होते आणि त्यामुळे कामादि सर्व विकार पूर्णपणे जिंकले जातात.[२] वैराग्यसंपन्न, प्रगत साधकाचा समाधी साधण्याच्या मार्गाची सुरुवात या चक्रापासून होते तेव्हा त्यास विहंगम मार्ग असे म्हणले जाते. |
सद्गुरू | - | मज्जाधातू (Marrow) |
गतिमान मन, संकल्प इ. शी,
मानसिक क्षमतांशी संबंधित |
|||||||
ललना [३] | |||||||
मध्यसंधि | आज्ञाचक्र आणि सहस्त्रदल यांच्यामधील सीमा | ||||||
सहस्त्रार / सहस्त्रदल चक्र | मस्तकामध्ये (मेंदूमध्ये) | यामधून अमृत पाझरते असे शास्त्र सांगते, म्हणून मेंदूच्या त्या भागाला योगाच्या परिभाषेत चंद्र किंवा चंद्रामृत तळे (सत्रावीचे तळे) असे म्हणतात. [२]
डोळ्यांची, कानांची, नाकाची अशी प्रत्येकी दोन, तोंड, मलद्वार (गुद), मूत्रद्वार अशी प्रत्येकी एक - ही नवद्वारे व ब्रह्मरंध्र हे दहावे द्वार - ते योगसामर्थ्याने उघडता येते. ब्रह्मरंध्र - यालाच काकीमुख असेही म्हणले जाते.[२] |
- | सर्व धातू समविष्ट [१] | |||
उच्च मन, प्रदीप्त मन, अंतर्ज्ञानात्मक मन, अधिमानस यांच्याशी संबंधित [१] |
कार्य
संपादनआधुनिक वैद्यक विचार
संपादनअधिक वाचन
संपादनसूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हणले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे.
क्र. | मंत्र | चक्र |
---|---|---|
१ | ॐ मित्राय नमः | अनाहत चक्र |
2 | ॐ रवये नमः | विशुद्धी चक्र |
३ | ॐ सूर्याय नमः | स्वाधिष्ठान चक्र |
४ | ॐ भानवे नमः | आज्ञा चक्र |
५ | ॐ खगाय नमः | विशुद्धी चक्र |
६ | ॐ पूष्णे नमः | मणिपूर चक्र |
७ | ॐ हिरण्यगर्भाय नमः | स्वाधिष्ठान चक्र |
८ | ॐ मरीचये नमः | विशुद्धी चक्र |
९ | ॐ आदित्याय नमः | आज्ञा चक्र |
१० | ॐ सवित्रे नमः | स्वाधिष्ठान चक्र |
११ | ॐ अर्काय नमः | विशुद्धी चक्र |
१२ | ॐ भास्कराय नमः | अनाहत चक्र |
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b c d Sujata Nahar (2001). Mother's Chronicles - part 06. MYSORE: INSTITUT DE RECHERCHES EVOLUTIVES, Paris and MIRA ADITI, Mysore. ISBN 2-902776-69-1.
- ^ a b c d स्वामी स्वरूपानंद (१९६०). श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी (पूर्वार्ध). पावस: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस.
- ^ "Complete Package of Pranayama for Beginner's". Swami Ramdev.