चक्रासन
चक्रासन एक योगासन आहे. याची प्रक्रिया अशी जमिनीवर उताणे झोपतात. दोन्ही पायदुमडून नितंबाजवळ आणतात. दोन्ही पायातले अंतर चार ते सहा अंगुळे ठेवतात. दोन्ही हात कोपरात दुमडून डोक्याजवळ घेतात. मग पूरक करून कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग जमिनिपासून वर उचलतात. डोके शक्य तितके पाठीमागे वळवतात.अशा प्रकारे शरीर चक्रासारखे गोलाकार करतात. या आसनाचा काळ हळूहळू वाढवीत नेतात. याच्या अभ्यासाने तारुण्य दीर्घकाळ टिकून राहते.