फलस्थ नगरे जातं द्वारावत्यां निवासिनम |

नौम्यहं चक्रपाणी तं जनकद्विजनंदनम ||

-वडील          :  जनकनायक

-आई            :  जनकाईसा  

-अवतार दिन  :  अश्विन शुद्ध नवमी सकाळ ०५:००   

-जन्मस्थळ     :   फलटण

-युग              :   कलियुग

-प्रमुख भक्त   :   अनंत मुनी उधळी नाथ

श्रीचक्रपाणी/श्रीचांगदेवराउळ महाराज -

जसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. ते महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत. लीळाचरित्र या मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लीळाचरित्र याचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामी च आहेत. इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती लीळाचरित्राच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके संवत्सर ११४२ भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव माल्हणदेवी (माल्हाईसा) होते. सर्वज्ञ श्रीचक्रधरांचे जन्म नाव हरिपाळदेव असे होते.

तारुण्यात आल्यावर हरिपाळदेव यांचा विवाह कमळादेवी (कमळाईसा) यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला. पुढे हरिपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरिपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्रीचांगदेव राऊळ यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरिपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरिपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता. ही अवतारधारणाची घटना शके संवत्सर ११४२ भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली.

महानुभावपंथात द्वारावतीकार श्रीचक्रपाणी महाराजांचा अवतार हा कली युगात पीता जनकनायकापासून माता जनकाईसा यांच्या गर्भी कऱ्हाडे ब्राम्हण कुटुंबात जन्मलेला गर्भीचा अवतार होय. महानुभाव पंथी यांच्या मताप्रमाणे हा परमेश्वरावतार असून अच्छादनिचा  अवरदृश्य अवतार होय.श्री दत्तात्रेय प्रभू यांचे पासून माहूर येथे उभय शक्तींचा स्वीकार करून यांनी आपल्या अवतार कार्य सुरुवात केली.शक्ती स्वीकारा नंतर माहूर येथे सहा महिने वास्तव्य करून यात्रेकरूंच्या भव्य सोबत त्यांनी द्वारावती ला प्रयाण केले व त्यानंतर आपल्या दैनंदिन आयुष्याची 63 वर्षे त्यांनी आपल्या ज्ञानदानाचे समता व सामाजिक क्रांतीचा कृती पर संदेश देण्याचे कार्य अखंड सुरू ठेवले.

श्री चक्रपाणी अवतारा बाबत जी काही माहिती मिळते ती लीळाचरित्रात आलेल्या आलेल्या मधूनच या सर्वच लीळा श्रीचक्रधर स्वामींनी प्रसंगानुरूप आपल्या भक्तजनांना निवेदन केल्याचे दिसून येते. महानुभावीय मताप्रमाणे हा अच्छादनईचा अवरदृश्य अवतार असल्यामुळे तो जिओधारक नाही असा समज होणे चुकीचे होईल कारण हा अवतार सुद्धा जिओधारकच आहे कारण अन्वयकार आपल्या 'नामाचे दहा ठाय'  या प्रकरणात 'चांग' या शब्दाचा अर्थ विशद करताना म्हणतात 'चांग म्हणजे सुंदर: साजात्याते  वेधी तो चांग: आपुलानी सौंदर्यगुने  जनाते आकरषोनी: ईश्वर प्रतीती करूनी: कैवल्य दान देती: म्हणुनी श्री चांगदेव राऊळ:' इतर अवताराप्रमाणेच या अवताराच सुद्धा विशेषत्व वेगळेच आहे या अवताराचे विशेषत्व सांगताना श्री चक्रधर स्वामी म्हणतात "तेथीची क्रीडा एसी कि: श्री चांगदेव राऊळांचा डावीये श्री करी सूप: उजवी श्रीकरी खराटा: गोसावी खराटे यांनी बिदी झाडिती: सुपी पूंजे भरिती:  मा मा म्हणुनी श्री मुकुटावर ठेविती: मा मा म्हणुनी गोमती मध्ये घालिती: ... ऐसे   प्रत्यही सवाए  दोन्ही पहार व्यापार करीती: अशाप्रकाराने जीवांना ऊर्ध्व करणारा अवतार वर हेच अवताराचे वेगळे विशेषत्व आहे.

या अवताराचे कार्य सांगताना श्री चक्रधर स्वामी म्हणतात "द्वारावतीकारा पासौनी अनंता सिद्धी: सुपेंनी हाणती तयासी मार्ग प्रगटे: खराटेनी  हानेती तयासी  विद्या प्रगटे: .. अशी बावन्ना पुरुषा विधादाने: " म्हणजे या अवताराने बाहुल्ले विद्यादानाचे कार्य केलेले आहे. एवढेच नाही तर द्वारावती कारा श्री चक्रपाणी महाराजांची दैनंदिन क्रीडा सुद्धा तशीच आगळी स्वामी म्हणतात "..द्वारावती निर्विकल्प क्रीडा करिती: करहेकंचुकी आसन: शुद्राचा घरी आरोगना करिती: जैसीची नगरामध्ये सकळ गृही क्रीडा करिती: तैसीचि अंत्यजाचा घरी क्रीडती:"  श्री चक्रपाणी महाराजांबाबत उपरोक्त सर्व बाबींचा विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की एका उच्चवर्णीय कऱ्हाडे ब्राह्मण कुळात जन्मलेल्या व वेदशास्त्रसंपन्न त्या काळात म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या ही एक शतक आधी होऊन गेलेल्या पुरुष रुद्राचा घरी आरोग्य करतो आपल्या आयुष्याची दैनंदिन ६३ वर्षे द्वारावती च्या आधी या तब्बल सात तास झाडतो अशा त्या पुरुषांबाबत समाजाने किंचितही दखल घेतलेली दिसत नाही त्या काळात आठशे वर्षांपूर्वी अशा सामाजिक क्रांतीच्या कृती पर्सन देशाची मुहूर्तमेढ रोवणारा महापुरुष अशी श्रीचक्रपाणी महाराजांबद्दल दखल यापुढे तरी घेतल्या जावी किंवा असा कोणी प्रयत्न तरी करावा हीच अपेक्षा...


संदर्भ

संपादन