घोषा कक्षीवती ही प्राचीन वैदिक भारतातील स्त्री होती.[१]ती दीर्घतमस या ऋषीची नात तर काक्षिवत याची कन्या होती. [२]या दोघांनीही अश्विन कुमारांच्या (दैवी वैद्यांचे जुळे) कौतुकाची सूक्ते रचली आहेत.[३]

रचना संपादन

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील दोन सूक्ते (क्र. ३९ व ४०) ही घोषाने रचल्याने मानले जाते. [४]पहिल्या सूक्तात अश्विनांची स्तुती आहे तर दुसऱ्या सूक्तात तिच्या वैयक्तिक इच्छांचा उल्लेख आहे.

सूक्तांनुसार घोषाला कुष्ठरोगामुळे विद्रूपता आलेली होती.[५] उतारवयात अश्विन कुमारांनी तिची व्याधी दूर करून तिला आरोग्य, तारुण्य आणि लावण्य दिले. त्यामुळे तिचा विवाह होऊ शकला असे [६]

संदर्भ संपादन

  1. ^ Agrawal, S. P.; Aggarwal, J. C. (1992). Women's Education in India (इंग्रजी भाषेत). Concept Publishing Company. ISBN 978-81-7022-318-4.
  2. ^ Dalal, Roshen (2014-04-15). The Vedas: An Introduction to Hinduism’s Sacred Texts (इंग्रजी भाषेत). Penguin UK. ISBN 978-81-8475-763-7.
  3. ^ "Vedic Women: Loving, Learned, Lucky!". Retrieved 2012-11-04.
  4. ^ Rig-Veda-Sanhita, the Sacred Hymns of the Brahmans ; Together with the Commentary of Sayanacharya ; Edited by Max Müller, Published Under the Patronage of the Honourable the East-India-Company (हिंदी भाषेत). Allen. 1874.
  5. ^ Mahendra Kulasrestha (2006). The Golden Book of Rigveda. Lotus Press. p. 221. ISBN 978-81-8382-010-3.
  6. ^ Vettam Mani (1975). Puranic encyclopaedia. Motilal Banarsidass. p. 291. ISBN 978-0-8426-0822-0.