ग्रँड जंक्शन प्रादेशिक विमानतळ
(ग्रॅंड जंक्शन विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रँड जंक्शन प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: GJT, आप्रविको: KGJT, एफ.ए.ए. स्थळसूचक: GJT) अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील विमानतळ आहे. मेसा काउंटीमधील ग्रँड जंक्शन शहरातील हा विमानतळ कॉलोराडोच्या पश्चिम भागात असून येथून अमेरिकेच्या पश्चिम भागातील निवडक शहरांना विमानवाहतूक उपलब्ध आहे.
युनायटेड एक्सप्रेस, अमेरिकन ईगल आणि डेल्टा कनेक्शन येथील बहुतांश प्रवाशांची ने-आण करतात. याशिवाय येथून फेडेक्स एक्सप्रेसची रोजी एकदा कॉलोराडो स्प्रिंग्जला मालवाहतूक सेवा आहे.