ग्रीक पुराणकथा

(ग्रीक मिथकशास्त्र या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रीक पुराणकथा ह्या प्राचीन ग्रीसमधील काल्पनिक कथा आहेत. ह्या कथासंग्रहामध्ये प्राचीन ग्रीसमधील लोकांच्या प्रचलित देवदेवता व वीरपुरुषांबद्दलच्या, तसेच विश्वाची उत्पत्त्ती आणि घडण ह्याबद्दलच्या पौराणिक कथांचा समावेश होतो. त्याचबरोबर ह्या कथांमधून त्या लोकांची स्वतःची संस्कृती व प्रचलित रितीरिवाज ह्यांचेही स्वरूप दिसून येते.

ग्रीक त्रिमूर्ती आणि पृथ्वीच्या तीन राज्यांचे वितरण: झीउस गॉड (स्वर्ग), पोसेडॉन (समुद्र आणि समुद्र) आणि हेड्स (अंडरवर्ल्ड). थिओस (गौण देवता) या त्रिमूर्तीची मुले आहेत.

प्राचीन ग्रीसमधील राजकीय व धार्मिक संस्था आणि प्राचीन ग्रीक संस्कृतीवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी, तसेच पुराणकथांची व्युत्पत्ती कशी होते हे शोधण्यासाठी, ह्या पुराणकथा व काल्पनिक कथांचा अभ्यास उपयोगी पडतो.

ग्रीक पुराणकथांवरील पुस्तके

संपादन
  • ग्रीक कथा (प्रा. गो.वि. तुळपुळे)
  • ग्रीकपुराण : कथा-महाकाव्य-शोकात्मिका (सुप्रिया सहस्रबुद्धे)
  • ग्रीक पुराणकथा (पंढरीनाथ रेगे)
  • ग्रीक महाकाव्ये महाकवी होमरकृत इलियड व ओडिसी (स्मिता कापसे)