ग्रँडमास्टर (बुद्धिबळ)
(ग्रँडमास्टर या पानावरून पुनर्निर्देशित)
बुद्धिबळ या खेळामध्ये ग्रॅंडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी फिडे मार्फत दिली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर २५०० किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग मिळवल्यास त्यास ग्रॅंडमास्टर ही पदवी मिळते. एकदा ग्रॅंडमास्टर ही पदवी मिळाल्यानंतर ती परत घेतली जात नाही. ग्रॅंडमास्टर मिळवल्यानंतर खेळाडूचे रेटिंग २५०० पेक्षा कमी झाले तरी ही काढून घेतली जात नाही. आयुष्यभर अबाधित राहते. भारताचा सर्वात पहिला ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद हा होय. सद्यस्थितित ३२ भारतीय खेळाडू ग्रॅंडमास्टर आहेत. परिमार्जन नेगी हा भारताचा सर्वांत कमी वयात ग्रॅंडमास्टर टायटल जिंकणारा खेळाडू आहे. त्याने केवळ वयाच्या तेराव्या वर्षी ग्रॅंडमास्टर मिळवले.[१]