गोएअर

(गो एअर या पानावरून पुनर्निर्देशित)

गो एअर ही मुंबईमधील स्वस्त दरात विमानसेवा देणारी भारतीय कंपनी आहे.[१] नोव्हेंबर २००५ पासून सुरु झालेली ही कंपनी वाडिया समूहाच्या मालकीची आहे. मे २०१३ रोजी बाजारभावाप्रमाणे भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती.[२] स्थानिक प्रवाश्यांससाठी २१ शहरांमधून रोजच्या रोज १०० उड्डाणे व आठवडयाला ७५० उड्डाणे केली जातात.[३] मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ [४] आणि नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मध्यवर्ती केंद्र आहे.

गोएअर
GoAir Logo.png
आय.ए.टी.ए.
G8
आय.सी.ए.ओ.
GOW
कॉलसाईन
GO AIR
स्थापना २००५
हब इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली)
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई)
मुख्य शहरे केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगळूर)
श्रीनगर विमानतळ (श्रीनगर)
विमान संख्या १९
मुख्यालय वरळी, मुंबई
प्रमुख व्यक्ती जहांगिर वाडिया
संकेतस्थळ http://www.goair.in/

इतिहाससंपादन करा

भारतीय उद्योजक नस्ली वाडीया यांचे थोरले सुपुत्र जहांगीर वाडिया यांनी [४] बॉम्बे डाईंग आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीजसारख्या सुप्रसिद्ध कंपन्या यशस्वीपणे चालविल्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये गो एअर या विमान कंपनीची स्थापना केली..[५] ते ह्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.[६] एअर ए ३२० या विमानाच्या वापराने गो एअरची सुरूवात झाली.[५] सुरूवातीच्या काळातच विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो, स्पाईसजेट यांसारख्या विमान कंपन्याकडून तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे गो एअरचा बाजारपेठेतील वाटा खूप कमी होता.[७]

गो एअरची प्रवासी विमानसेवा असलेली भारतातील राज्येसंपादन करा

भारतामधील २२ विमानतळांवरून गो एअरची दैनंदिन १४०, व साप्ताहिक ९७५ उड्डाणे होतात.[३] भारतीय नागरी वाहतूक खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या ताफयात फक्त १९ विमाने असल्यामुळे गो एअरला आंतराराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी नाही..[८]

शहर IATA ICAO विमानतळ
अहमदाबाद AMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
बंगळूर BLR VOBL केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
भुवनेश्वर BBI VEBS बिजु पटनायक विमानतळ
चंदीगढ IXC VICG चंदीगढ विमानतळ
चेन्नई MAA VOMM चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ
दिल्ली DEL VIDP इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Hub
गोवा GOI VOGO दाबोळी विमानतळ
गुवाहाटी GAU VEGT लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ
जयपूर JAI VIJP जयपूर विमानतळ
जम्मू IXJ VIJU जम्मू विमानतळ
कोची COK VOCI कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोलकाता CCU VECC नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
लेह IXL VILH लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
लखनौ LKO VILK चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुंबई BOM VABB छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ Hub
नागपूर NAG VANP डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाटणा PAT VEPT लोकनायक जयप्रकाश विमानतळ
पोर्ट ब्लेअर IXZ VOPB वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
पुणे PNQ VAPO पुणे विमानतळ
रांची IXR VERC बिर्सा मुंडा विमानतळ
सिलिगुडी IXB VEBD बागडोगरा विमानतळ
श्रीनगर SXR VISR श्रीनगर विमानतळ

विमाने व उड्डाणे यांची आकडेवारीसंपादन करा

GoAir Fleet
विमान सेवेमधील मागणी प्रवासी तपशील
एअरबस ए३२०-२०० १८ १८० एक स्वतःच्या मालकीचे आणि १५ भाडेतत्तवावरील(VT-GOL,VT-GOM & VT-GON)
एअरबस ए३२०-निओ ७२
टीबीए
२०१५ पासून पुरवठा[९]
एकूण १८ ७४

ए३२० निओची मागणीसंपादन करा

जून २०११ मध्ये गो एअरने .३२४ अब्ज रुपये किंमतीच्या ७२ ए३२० निओ या सुधारित नवीन इंजिन असलेल्या एअरबसची मागणी केलेली आहे.[१०] एअरबसची ए320 ही सुधारित आवृत्ती असून १८० आसनी असलेल्या या विमानामध्ये बर्‍याच अधिक सुविधा आहेत. ही विमाने २०१५पासून पुढे दरवर्षी १२-१५ विमाने गो एअरच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.[१०]

लिव्हरीसंपादन करा

जेव्हा गो एअरने विमान वाहतुकीस सुरूवात केली तेव्हा त्यांच्या ताफयातील प्रत्येक विमानाच्या आतील भाग निळया, गुलाबी, नारिंगी, सफेद, हिरवा अशा वेगवेगळया रंगामध्ये रंगवले जात होते.[१०] २०११ नंतर मात्र विमानातील आतील भाग एकाच म्हणजे करडया रंगामध्ये रंगविले जात आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • विमानाच्या बाहेरचा तळाच्या भागाला, आणि पंखाकडील कडांना, आणि शेपटीला करडा रंग..
  • गो एअरची वेबसाईट डब्लयू डब्लयू डब्लयू. गोएअर.इन हीदेखील विमानाच्या इंजिनावर पांढर्‍या पार्श्वभूमीवर आणि करडया रंगाने दर्शविली जात आहे.
  • करडया रंगात रंगविलेल्या शेपटीवर मध्यभागी गोएअरचा लोगेा काढलेला आहे.

विमानातील सेवकसंपादन करा

जुलै २०१3 मध्ये गोएअरने पुढील सात वर्षाच्या काळासाठी इंधन बचत होण्याच्या उददेशाने महिला सेवक घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु १३० पुरुष सेवकांना बेकार न करण्याचे कबूल केले आहे. [११] [१२]

अंतर्गत सेवासंपादन करा

गोएअर मध्ये इकॉनॉमी वर्गाच्या प्रवाशांना फक्त बसण्याची व्यवस्था करण्यात येत असून जेवणासाठी सोय उपलब्ध नाही. पण प्रवाशांना स्वखर्चाने चहा काफी सारखी पेये, सॅण्डविच, पराठे, बिस्किटे, शेंगदाणे, शीतपेये, पिण्याचे पाणी आणि इतर पदार्थ विकत घेण्याची सोय आहे. मनोरंजनाच्या सुविधा मर्यादित असून विमानामध्ये दैनिक भास्कर ग्रुपकडून प्रकाशित होणारी मासिके प्रवाशांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात.

पुरस्कारसंपादन करा

पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशन यांचेकडून उत्तम दर्जा आणि सुविधा दिल्याबददल उत्कृष्ट स्थानिक विमानसेवा देणारी कंपनी (२००८) हा सन्मान[१३] एअरबसकडून उत्कृष्ट सेवा देणारी विमानवाहतूक कंपनी.[१४]

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ ""गो एअर : संपर्क साधा"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ ""बाजारभाव"" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. a b ""गो एअर : स्थानके"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. a b आंतरराष्ट्रीय फलाईट ""डिरेक्टरी : वर्ल्ड एअरलाईन्स."" Check |दुवा= value (सहाय्य) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. a b ""गोएअर : आमच्याविषयी"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ ""ग्राहकांच्या इच्छेपेक्षा गरज निर्माण होईपर्यंत लहानच रहा : जे वाडीया."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "ओन बोर्ड गो एअर एअरलाइन्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ ""कमी किमतीमध्ये विक्री करणार नाही."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "गो एअर ने ७२ नवीन एअरबसची मागणी केली."
  10. a b c ""गो एअरने 3२,०००/- कोटी रुपयांत ७२ एअरबस विमानांची मागणी केली."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ [१]
  12. ^ [२]
  13. ^ ""गोएअरला पीएटीडब्ल्यूएचा उत्त्म दर्जा आणि सुविधा दिल्याबददल पुरस्कार."[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  14. ^ ""एअरबसकडून गोअरचा उत्त्कृष्ट सेवा देणारी विमान कंपनी म्हणून गौरव."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत