गोविंद शंकर कुरूप

जनपथ पुरस्कार विजेते

गोविंद शंकर कुरूप (३ जून, इ.स. १९०१ - २ फेब्रुवारी, इ.स. १९७८)[१] मलयाळम भाषेतील प्रसिद्ध कवि होते. त्यांचा जन्म केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील नायतोट या गावामधे झाला.

गोविंद शंकर कुरूप
जन्म नाव गोविंद शंकर कुरुप
जन्म ५ जून, १९०१
नायतोट्ट, केरळ, भारत
मृत्यू २ फेब्रुवारी, १९७८
त्रिवेंद्रम, केरळ, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मलयाळम
साहित्य प्रकार कविता
विषय प्रेम, प्रकृति, आध्यात्म
वडील शंकर वारियर
आई वडक्कनी लक्ष्मीकुट्टीअम्मा
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार-१९६५

बालपण आणि शिक्षण संपादन

वडिलांच्या अकाली निधनाने गोविंद शंकर यांचे बालपण खडतरच गेले. मग मामाच्या देखरेखीखाली त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे मामा प्रसिद्ध ज्योतिषी होते. व्यासंगी पंडित असल्याने त्यांच्या सहवासात सहजपणे त्यांना संस्कृतची आवड निर्माण झाली. गोविंद शंकर कुरूप यांनी वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत ‘अमरकोश’, ‘सिद्धरूपम्’, ‘श्रीरामोदन्तम्’ इत्यादी ग्रंथ मुखोद्गत केले होते. ‘रघुवंशा’सारख्या महाकाव्याचे श्लोकही त्यांनी वाचले होते. इंग्रजी भाषा आणि साहित्याच्या अध्ययनामुळे त्यांना काव्य आवडू लागले. त्यातही केरळच्या निसर्गसंपन्न भूमीच्या आकर्षणामुळे ते वयाच्या ९व्या वर्षी कवी बनले. पुढे १९१८ मध्ये श्री. कुरूप मल्याळी साहित्यातील ‘पंडित’ ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९२६ मध्ये मद्रास विश्वविद्यालयाच्या विद्वान परीक्षेत्ही ते उत्तीर्ण झाले.

नोकरी आणि विरोध संपादन

१९३६मध्ये एर्नाकुलम येथील महाराजा कॉलेजमध्ये मल्याळी आणि संस्कृत या विषयांचे लेक्चरर म्हणून गोविंद शंकर कुरूप यांची नेमणूक झाली. कुरूप पदवीधर नसताना कॉलेजमध्ये शिकवतात हे काहीजणांना आवडले नाही. त्यांनी ‘कुरूप हे पक्के कम्युनिस्ट असून, इंग्रज सरकार व महाराज यांच्याविरुद्ध लोकांना भडकवण्याकरिता, क्रांतिकारी कविताद्वारे प्रेरणा देतात’ अशी कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांची ‘नाल’ (भविष्यकाळ) ही कविता या तक्रारीचे कारण झाली होती. या कवितेत शोषणाविरुद्ध क्रांतिकारक संदेश होता व क्रांतिकारी तरुणांनी या कवितेची खूप प्रशंसा केली होती.

पुस्तके संपादन

वयाच्या नवव्या वर्षी गोविंद शंकर कुरूप यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली आणि १९२३ ते २९ मध्ये ‘साहित्यकौतुकम्’चे चार खंड प्रकाशित झाले. एकूण २५ काव्यसंग्रह प्रकाशित झाले. ‘सूर्यक्रान्ति’, ‘निमिषम्’, ‘अन्तर्दाहं’, ‘विश्वदर्शनम्’, ‘पाथेयम्’ इ. त्यांच्या निवडक कवितांचे संग्रह आहेत. १९७२ मध्ये ते प्रकाशित झाले. त्यांचे ‘मधुरम् सौम्यम् दीप्तम्’, ‘वेळिच्चतिष्टे दूतम्’ आणि ‘सान्ध्यरागम्’ हे तीन काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय आहेत.

काव्य, निबंधसंग्रह, नाटक, बालसाहित्य, आत्मकथा आणि अनुवादलेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. ‘सान्ध्य’, ‘ऑगस्ट १५’ इ. तीन नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘ओम्र्मयुटे ओलंगलिल’ हे दोन खंडांतील त्यांचे आत्मकथन १९७८ मध्ये प्रसिद्ध झाले. १९४८ मध्ये त्यांनी ‘निर्मला’ या चित्रपटासाठी गीतलेखनही केले आहे.

बंगाली, संस्कृत, फ्रेंच, फारसी इ. भाषांतील काही साहित्याचे अनुवादही त्यांनी केले आहेत. तसेच कुरूपजींच्या रचनांचे हिंदी, इंग्रजी इ. अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. धारवाड येथील प्रसिद्ध हिंदी भाषाप्रेमी मट्टतिरिजी यांनी कुरूपजींच्या अनेक कवितांचे हिंदी पद्यानुवाद केले आहेत.

केरळ साहित्य परिषदेच्या ‘परिषद’ या मुखपत्राचे ते संपादक होते. मल्याळी साहित्य परिषदेचेही ते बरीच वर्षे अध्यक्ष होते, तसेच १९६८-७२ या काळात राज्यसभा सदस्य होते

कुरूप यांचे काही कविता संग्रह संपादन

साहित्य कौतुकम् - चार खंड (१९२३-१९२९), सूर्यकांति (१९३२), नवातिथि (१९३५), पूजा पुष्पमा (१९४४), निमिषम् (१९४५), चेंकतिरुकल् मुत्तुकल् (१९४५), वनगायकन् (१९४७), इतलुकल् (१९४८), ओटक्कुणल (१९५०), पथिकंटे पाट्टु (१९५१), अंतर्दाह (१९५५), वेल्लिल्प्परवकल् (१९५५), विश्वदर्शनम् (१९६०), जीवन संगीतम् (१९६४), मून्नरुवियुम् ओरु पुष़युम् (१९६४), पाथेयम् (१९६१), जीयुहे तेरंजेटुत्त कवितकल् (१९७२), मधुरम् सौम्यम् दीप्तम्, वेलिच्चत्तिंटे दूतम्, सान्ध्यरागम्, वगैरे.

पुरस्कार संपादन

  • भारत सरकारचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार गोविंद शंकर कुरूप यांना इ.स. १९६५ मध्ये ओटक्कुणल या पुस्तकाच्या लेखनासाठी व त्यांच्या १९२० ते १८५८ या काळावधीत प्रकाशित झालेल्या भारतीय भाषेतील सर्जनशील साहित्यासाठी प्रदान करण्यात आला. कुरूप यांनी एक लाख रुपयांच्या या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून १९६८ मध्ये ‘ओट्क्कुणल’ पारितोषिकाची सुरुवात केली.

बाह्य दुवे संपादन

  1. ^ श्रोत्रिय, डॉ॰ प्रभाकर. ज्ञानपीठ पुरस्कार. नवी दिल्ली. p. 18. 81-263-1140-1. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)