गोविंद नामदेव (१९५० - हयात) हे हिंदी चित्रपटांमधील एक कलाकार आहेत. ते डेव्हिड धवन ह्यांच्या 'शोला और शबनम' (इ.स. १९९२) ह्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संस्थेचे ते विद्यार्थी असून बॉलीवूड मधील अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

मध्य प्रदेशातील सागर ह्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे.