मर्सिडिझ-बेन्झ अरेना

(गॉट्ट्लीब डाइमलर मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg

मर्सिडिझ-बेन्झ अरेना (जर्मन: Mercedes-Benz Arena) हे जर्मनी देशाच्या श्टुटगार्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. इ.स. १९९३ पर्यंत हे स्टेडियम नेकरस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. १९९०च्या दशकामध्ये ह्या स्टेडियमच्या पुनर्बांधणी व सुधारासाठी डाइमलर-बेन्झ कंपनीने निधी पुरवल्यामुळे गोटलिब डाइमलरचे नाव ह्याला दिले गेले. २००८ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून सध्याचे मर्सिडिझ-बेन्झ अरेना हे ठेवण्यात आले.

मर्सिडिझ-बेन्झ अरेना
Mercedes-Benz-Arena Stuttgart.jpg
मागील नावे गॉट्ट्लीब-डाइमलर-स्टेडियोन , नेकरस्टेडियोन
स्थान श्टुटगार्ट, जर्मनी
उद्घाटन २३ जुलै १९३३
पुनर्बांधणी १९५१, २००३, २००५
बांधकाम खर्च ६.३५ कोटी युरो
आसन क्षमता ६०,४४१
वापरकर्ते संघ/स्पर्धा
फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट (१९९३ ते चालू)

आजवर येथे १९७४२००६ फिफा विश्वचषकांमधील, युएफा यूरो १९८८ स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा चँपियन्स लीगच्या १९५९ व १९८८ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामनेसंपादन करा

१९७४ फिफा विश्वचषकसंपादन करा

१९७४ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
  पोलंड 3-2   आर्जेन्टिना पहिली फेरी 31,500
  आर्जेन्टिना 1-1   इटली पहिली फेरी 68,900
  पोलंड 2-1   इटली पहिली फेरी 68,900
  स्वीडन 0-1   पोलंड दुसरी फेरी 43,755

युएफा यूरो १९८८संपादन करा

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
  इंग्लंड 0-1   आयर्लंडचे प्रजासत्ताक पहिली फेरी 51,573
  सोव्हियेत संघ 2-0   इटली उपांत्य-फेरी 61,606

२००६ फिफा विश्वचषकसंपादन करा

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
  फ्रान्स 0-0   स्वित्झर्लंड गट ग 52,000
  नेदरलँड्स 2-1   कोत द'ईवोआर गट क 52,000
  स्पेन 3-1   ट्युनिसिया गट ह 52,000
  क्रोएशिया 2-2   ऑस्ट्रेलिया गट फ 52,000
  इंग्लंड 1-0   इक्वेडोर १६ संघांची फेरी 52,000
  जर्मनी 3-1   पोर्तुगाल तिसऱ्या स्थानाचा सामना 52,000


बाह्य दुवेसंपादन करा

स्टेडियमचे विस्तृत चित्र