गुलाबी चहा हा चहा लखनौ मध्ये मिळणारा चहाचा प्रकार आहे. हा चहा काश्मिरी चहाचा गोड प्रकार होय.केवडा, केशर, दालचिनी, वेलची आणि जायफळामुळे ह्याची एक वेगळीच चव असते. हा चहा तयार करताना फारच काळजी घेतली जाते. बेकींग सोडा आणि चहा पाने एक तासाच्या वर उकळली जातात आणि चहाला गडद रंग आला की तो केशर, दालचिनी, वेलची, लवंग, तमालपत्र, कुटलेले बदाम, दूध, आणि साखर घालून चार तासापर्यंत उकळवतात.लखनौचे प्रसिद्ध कलाकार सलीम अरीफ सांगतात की १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मोतीलाल नेहरू अलाहाबाद(प्रयागराज)ला स्थलांतरित झाले तेव्हा जे काश्मिरी त्यांच्याबरोबर स्थलांतरित झाले त्यांनी हा आगळावेगळा चहा लखनौ शहरात आणला. हिवाळ्यात हा फारच आवडीने लखनौ शहरात पिला जातो. गुलाबी चहा समोवरात बनविला जातो आणि कुल्हाडात प्यायला दिला जातो.

चहाची खासियत हा चहा नुसता रंगीत नाही तर त्याची चवही आगळीवेगळी आहे. चहा मध्ये हवा गेल्यावर त्याचा गुलाबी रंग खुलून येतो. त्यासाठी चहा २० मिनिटे जोरात ढवळून काढतात.दुसरी पद्धत म्हणजे दोन तासभर १५ मिनिटाच्या अंतराने चमच्याने चहा वर खाली करतात आणि दूध टाकल्यावर चहा गुलाबी रंगाचा होतो.लखनौमध्ये चौकात अकबरी गेट जवळ चहा दुकान चालविणारे मोहम्मद साबिर म्हणतात रमझान आणि हिवाळ्यात ते एका रात्रीत ५०० च्या वर ग्राहकांना चहा देतात. हा चहा पचनासाठी चांगला आहे. काही ठिकाणी ह्या चहात शेंगदाणे सुद्धा टाकतात. रबडी आणि सुक्यामेव्याचा चहावर थर दिला की त्याची चव एकदम न्यारी होते.कुल्हाडात हा चहा अगदी झकास लागतो.

साहित्य संपादन

२ चमचे हिरवा चहा १/२ चमचा खाण्याचा सोडा ३ वेलदोडे १ बडीशेप २ चमचे पिस्ता २ ग्लास पाणी चवीनुसार साखर.

कृती संपादन

१.उकळत्या पाण्यात चहापाने आणि खाण्याचा सोडा टाकून एक तास मंद आचेवर ठेवतात. २.वेलदोडे आणि बडीशेप टाकून पुन्हा १५-२० मिनिटे मंद आचेवर ठेवतात. ३.गाळून त्यामध्ये १ कप थंड पाणी टाकून फेसाळ होईपर्यंत ढवळतात. ४.दूध आणि पिस्ता घालतात.चहा गुलाबी होईपर्यंत दूध घालत राहतात. उकळी आल्यावर चवीनुसार साखर टाकतात आणि गरमागरम प्यायला देतात.

संदर्भ संपादन

मुंबई टाईम्स २९/०८/२०१९.