डॉ. गुरुराज मुतालिक, एम.डी एफ्‌ए‍एम्‌एस, हे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये आधी प्राध्यापक व नंतर अधीक्षक होते. पुढे महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाचे संचालक असताना त्यांना जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) निमंत्रण आले आणि ते अमेरिकेत 'डब्ल्यूएचओ'मध्ये संचालकपदी रुजू झाले. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी २००९ सालापासून अमेरिकेतच 'माइंड, बॉडी मेडिसीन' (एम्‌बीएम)चा अभ्यास सुरू केला.

डॉ. गुरुराज मुतालिक यांचा जन्म मार्च १९२९मध्ये भारतातल्या कर्नाटक राज्यातील एका खेड्यात झाला. त्यांचे वडील कर्मठ असून त्यांचे परंपरागत धर्मशास्त्राचे चांगले अध्ययन होते. ते संस्कृत भाषेचे जाणकार व वेदान्त विषयात प्रवीण होते. ते स्वतः रुग्णांवर आयुर्वेदाचे उपचार करीत. त्यांनी गुरुराजसह आपल्या सर्व मुलांना या विषयांची गोडी लावली.

अमेरिकेत एम्‌बीएम संपादन

अमेरिकेत काही वर्षांपासून 'माइंड, बॉडी मेडिसीन' हा परवलीचा शब्द बनला आहे. मोठी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनीही या विषयाला वाहिलेले स्वतंत्र विभाग स्थापन केले आहेत. Maharishi International University, Fairfield, Iowaपासून सुरू झालेला हा प्रवास स्टॅन्फर्ड- हार्वर्डपर्यंत येऊन पोचला आहे. व्यापक संशोधन होत असून, अमेरिकेतील या नवीन विज्ञानाचे चमत्कारिक परिणाम दिसून येऊ लागले आहेत.

अमेरिकी 'एम्‌बीएम'चे मूळ भारत आणि चीनमध्ये आहे; विशेषतः योगशास्त्रत आहे. १९७३ सालाच्या आसपास महर्षी विद्यापीठाच्या माध्यमातून अमेरिकेत 'एमबीएम'ची बीजे रोवली गेली आणि आज अमेरिकेतील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये 'एमबीएम'च्या शाखा आहेत. यावर संशोधन केल्यानंतर 'हा तर चमत्कार आहे' असे अमेरिकी विद्यापीठांना वाटले. त्यामुळे या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवणारा एक नवाच वर्ग अमेरिकेत उदयास आला आहे. अशा नागरिकांची संख्या अडीच कोटींच्या घरात असल्याचे डॉ. मुतालिक सांगतात. तेथे नियमित योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या २० टक्के आहे; तर ५६ टक्के लोक प्रचलित वैद्यकीय पद्धतीऐवजी अन्य पद्धतीचा उपयोग करीत आहेत.

एम्‌बीएम म्हणजे काय? संपादन

'एम्‌बीएम' म्हणजे दुसरे काही नसून मनःशक्तीचा शरीरदुरुस्तीसाठी कसा उपयोग करायचा याचे ज्ञान होय. त्याची केंद्रे अमेरिकेत कोलंबिया हॉस्पिटल, हार्वर्ड हॉस्पिटल अशा किती तरी नामांकित संस्थांमध्ये सुरू आहेत.

व्याख्यानांद्वारे प्रचार संपादन

डॉ. मुतालिक यांनी कर्करोग आणि मनःशक्ती यावर संशोधन केले आहे. सध्या ते अमेरिका, भारतात या विषयावर व्याख्यान देत असतात. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांनादेखील सुरुवातीच्या टप्प्यात 'एम्‌बीएम'द्वारे रोखता येऊ शकते, असे ते सांगतात.