गुरुराज देशपांडे ऊर्फ देश देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात; हुबळी, कर्नाटक - हयात) हे भारतीय-अमेरिकन उद्योजक आहेत. इ.स. १९९८ साली स्थापलेल्या सायकामोर नेटवर्क्स नावाच्या इंटरनेट कंपनीचा व मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या तंत्रशिक्षण संस्थेच्या देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन या केंद्राचे सहसंस्थापक आहेत. शाळेत मधल्या वेळचे स्वच्छ व पौष्टिक खाणे/आहार मुलांना मिळण्यासाठी इ.स.२००० मध्ये सुरू करण्यात आलेल्या अक्षय पात्र फाउंडेशनच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा सहभाग आहे.

बाह्य दुवे संपादन