गुंठामंत्री (कादंबरी)

(गुंठामंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)

गुंठामंत्री नावाची लेखक, कवी, पत्रकार दशरथ यादव यांची कांदबरी असून, यावर सिनेमाही निघत आहे. शेतजमिनीची मोजमाप पद्धत असून, ४० गुंठ्यांचा १ एकर होतो. शहरीकरणाचा वेग वाढल्यने एकरावर विकली जाणारी जमीन गुंठ्यावर विकली जाऊ लागली. जमिनीचे भाव वाढले त्यांमुळे गुंठा विकून हैस करणारे चैन करणारे रुबाबात मंत्र्यासारखे वागणारे लोक समाजात वावरू लागले. त्यावरून अलिकडच्या काळात गुंठामंत्री शब्द रुड झाला.दशरथ यादव यांनी गुंठामंत्री सदर सकाळमध्ये लिहून जमीनदार शेतकऱयांची कैफियत मांडली होती. गुंठामंत्री लावणी यादव यांनी लिहिली असून लावणी महोत्सवात सादर होत असते.