गिम्प म्हणजे ग्नू इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम GIMP होय. प्रतिमेचे बहुआयामी संपादन करणारी गिम्प ही मुक्त आणि व्यक्त आज्ञावली आहे. ही आज्ञावली संगणकीय प्रतिमा, छायाचित्रे इत्यादींचे संपादन करण्यासाठी वापरली जाते. गिम्प ही आज्ञावली लिनक्स, मॅक ओएस, मायक्रोसॉफ्ट विंडोज या कार्यकारी प्रणालीवरही उपलब्ध आहे.

गिम्प
मूळ लेखक स्पेनसर किंबॉल (Spencer Kimball), पिटर मॅथिस(Peter Mattis)
विकासक गिम्प आज्ञावली विकासक गट (The GIMP Development Team)
प्रारंभिक आवृत्ती १५ फेब्रुवारी, १९९६
सद्य आवृत्ती GIMP 2.10.14
(३१ ऑक्टोंबर, २०१९)
संगणक प्रणाली लिनक्स, मॅक ओएस, मायक्रोसॉफ्ट विंडोज, बी एस डी, Solaris
सॉफ्टवेअरचा प्रकार अदिश आलेखन संपादक
सॉफ्टवेअर परवाना GPLv3+[१]
संकेतस्थळ https://www.gimp.org
The GIMP icon - gnome

गिम्प ह्या आज्ञावलीचे स्वरूप संपादन

गिम्प हे बहुआयामी प्रतिमा संपादनाचे साधन आहे. छायाचित्राची सुधारणा करण्यासाठी, प्रतिमेची रचना बदलण्यासाठी आणि प्रतिमा निर्माण करणे यासह विविध प्रकारच्या प्रतिमांची हाताळणी या कार्यासाठी गिम्प हे योग्य असे साधन आहे. गिम्प हे विस्तारणीय आणि विस्तारयोग्य आहे. हे प्लग-इन आणि विस्तारासह वाढविण्याकरिता रचना केलेली आहे. जेणेकरून प्रतिमेचा कितीही विस्तार करता येतो, तसेच प्रतिमेचा विस्तार कमी करता येतो. प्रगत लिपीबद्ध बाह्यस्वरूप सर्वसाधारण कार्यातून सर्वात जटिल प्रतिमा हाताळणी प्रक्रियेस सहजपणे लिपीत करण्याची परवानगी देते.

 

गिम्प ह्या आज्ञावलीची उपलब्धता संपादन

गिम्प बलस्थानांपैकी एक म्हणजे अनेक कार्यप्रणालीसाठी ही अनेक स्रोतांकडून त्याची विनामूल्य सहज उपलब्धता आहे. गिम्प मायक्रोसॉफ्ट विंडोज किंवा ऍपलच्या मॅक ओएस एक्स (डार्विन) सारख्या अन्य कार्यप्रणालीसाठी ही उपलब्ध आहे. गिम्प हे जीपीएल (GPL) परवानाधारक एक मुक्त कार्यप्रणाली (सॉफ्टवेर) अनुप्रयोग आहे. जीपीएल वापरकर्त्यांना संगणक प्रोग्राम तयार करणाऱ्या स्रोत अधिनियम मध्ये प्रवेश करण्याची आणि बदलण्याची स्वातंत्र्यता देते.

गिम्प ह्या आज्ञावलीचे वैशिष्ट्ये संपादन

  • गिम्प हे साधे संगणकावर चित्र काढण्यासाठी सुद्धा वापरण्यात येते.
  • गिम्प हे एक विशेषज्ञ गुणवत्ता छायाचित्रात काही किरकोळ बदल प्रणाली करिताही वापरतात.
  • गिम्प हे एक ऑनलाइन बॅच संसाधन पद्धत आहे.
  • गिम्प हे एक प्रचंड उत्पादन प्रतिमा प्रस्तुतकर्ता आहे.
  • प्रगत लिप्यंतर बाह्यस्वरूप सोपी कार्य पासून सर्वात जटिल प्रतिमा हाताळणी प्रक्रियेस सहजपणे लिपीत करण्याची सोय देते.
  • गिम्प हे धारिका जतन करू शकतो आणि ह्या धारिका अनेक प्रकारच्या धारिकांमध्ये (फॉरमॅटमध्ये) जसे जीआयएफ,जेपीएफ, टीआयएफएफ यात रूपांतर करू शकतो ते सोयीस्कर फ्रेममध्ये चलाभास लोड आणि जतन करू शकतो.
  • गिम्पच्या पटवलावर अमर्यादित प्रतिमा एकाच वेळी उघडता येतात.
  • लिनक्स, मॅक ओएस आणि मायक्रोसॉफ्ट विंडोजसह असंख्य कार्यप्रणालींसह गिम्प काम करते.

गिम्प आज्ञावलीचे दृश्य पटल संपादन

गिम्प ह्या आज्ञावलीचे शीर्षकपट्टी, सूचीपट्टी, साधनपेटी, स्थितीपट्टी आणि आलेख /रुलरपट्टी मुख्य पाच विभाग आहेत.

 
गिम्प आज्ञावलीचे पटल
  • शीर्षकपट्टी - शीर्षकपट्टी ही प्रतिमेच्या शीर्षस्थानी स्थित असते. ती त्या प्रतिमेचे नाव आणि त्याबद्दल काही मूलभूत माहिती दर्शविते.
  • सूचीपट्टी - शीर्षकपट्टीच्या खालीसूचीपट्टी असते. ह्या सूचीपट्टीच्या साहाय्याने प्रतिमेवर हवी ती प्रक्रिया करता येते.
  • साधनपेटी - प्रतिमेवरील आवश्यक अशा कार्यवाहीसाठी किंवा रेखाचित्रे तयार करण्यासाठीचे प्राथमिक कार्ये साधनपेटीच्या माध्यमातून करता येते.
  • स्थितीपट्टी - ही प्रतिमेच्या तळाशी असते. साधनपेटीच्या साहाय्याने प्रक्रिया करताना सदर प्रक्रिया प्रतिमेच्या कोणत्या भागावर केली जाते तो भाग दर्शविला जातो. प्रतिमेच्या स्थितीक्षेत्र कोणती प्रक्रिया केली केली जाते व त्या प्रक्रियेचे फलित कसे आहे हे यात दाखविले जाते.
  • आलेख /रुलरपट्टी - गिम्पच्या पटलावर अक्षांश व रेखांश याप्रमाणे वृत्तजाळी असते. त्यावरून त्या प्रतिमेची लांबी व रुंदी किती आहे हे पाहता येते.

गिम्प ह्या आज्ञावलीचे संवादपटल संपादन

गिम्प आज्ञावलीच्या मुख्य पाच विभागापैकी साधनपेची हा एक महत्त्वाचा भाग आहे. साधनपेटीतील विविध साधनांच्या साहाय्याने विविध प्रकारचे कार्य करता येतात.

 
गिम्पची साधनपेटी

आयताकृती निवड साधन संपादन

आयताकृती निवडसाधनाच्या साहाय्याने पटलावर रंगरंगोटी वा नक्षी काढण्यासाठी किंवा एखाद्या प्रतिमेवरील ठराविक भाग निवडण्यासाठी ह्या साधनाचा वापर केला जातो. ह्या साधनाद्वारे अवकाशनिश्चिती केली जाते. हे साधनपेटीतील सर्वात पहिले साधन आहे.

लंबगोलाकृती निवड साधन संपादन

आयताकृती साधनाप्रमाणेच लंबगोलाकृती निवडसाधनांचा गिम्प आज्ञावलीत वापर होतो. एखाद्या प्रतिमेतील लंबवर्तुळाकार क्षेत्रांना त्या प्रतिमेतून निवडण्यासाठी हे साधन वापरले जाते.

मुक्त निवड साधन संपादन

मुक्त निवड साधनाच्या साहाय्याने एखाद्या प्रतिमेचा हवा तेवढा भाग माउसच्या डाव्या बटनाद्वारे मुक्तपणे निवडता येतो. ही प्रक्रिया प्रतिमेवरील प्रारंभस्थानापासून सुरू होऊन ती सूचक स्थानापर्यत एका सरळ रेषेत (सुरुवात आणि शेवट) जोडून पूर्ण होते.

जादुई (फज्जी) निवड साधन संपादन

एखाद्या प्रतिमेवरील रंगछटांच्या समानतेवर आधारित भाग किंवा क्षेत्र ह्याची निवड करताना जादुई निवड साधन महत्त्वाची भूमिका निभावते. उहा. एखाद्या प्रतिमेवरील निळा वा लाल रंग ह्या साधनाच्या मदतीने निवडला गेला तर हे साधन निळ्या वा लाल रंगाच्या सर्वच रंगछटांची निवड करते.

रंगयुक्त निवड साधन संपादन

एखाद्या र्कतिमेवरील निवडक रंगछटांचा भाग निवडायचे असेल तर रंगाचा वापर करून निवड करता येते. हे साधन जादुई निवड साधनासारखेच कार्य करते. यांच्यात मुख्य फरक असा की, जादुची काडी अरुंद प्रदेशांना निवडते. आणि सर्व अंतर जोडून मोठा अंतर असलेल्या मार्गांनी सुरू होते. तर रंगयुक्त निवड साधन सर्व दृश्यबिंदू निवडतात; जे रंगीत दृश्यबिंदुसारखे असतात.

मजकूर/टंकलेखन निवडीचे साधन संपादन

ह्या साधनाच्या साहाय्याने निवडलेल्या प्रतिमेवर प्रतिमेसंदर्भात वा अन्य कोणताही मजकूर टंकलिखित करता येतो.

 
संवादपटल_मजकूर लेखन

टंकलिखित केलेला मजकूर प्रतिमेवरील आयताकृती चौकटीत स्थूलपटावर दिसतो.

साफसफाईचे (इरेजर) साधन संपादन

साफसफाईच्या साधनाद्वारे प्रतिमेवरील किंवा टंकिखित मजकूर वा त्यातील काही भाग खोडण्यासाठी किंवा पुसण्यासाठी ह्या साधनाचा वापर केला जातो.

 
गिम्प-साफसफाई साधन

हलवा/स्थानांतर साधन संपादन

स्तर, प्रतिमा वा मजकूर किंवा अन्य इतर घटक एका स्थानापासून दुसऱ्या स्थानी हलवण्यासाठी ह्या साधनांचा वापर/ उपयोग केला जातो.

दृश्यरुप(झूम) साधन संपादन

एखाद्या प्रतिमेचा दृश्यस्तर समायोजित करण्यासाठी ह्या साधनाचा वापर होतो. मूळ प्रतिमा वा मजकूर आहे तसाच ठेवून त्याचे दृश्यमान वाढवता (झूम) येते वा कमी करता येते.

कापा साधन संपादन

एखादी प्रतिमा वा प्रतिमेचा स्तर यांच्या कडा कापण्यासाठी किंवा कडा वेगळे करण्यासाठी ह्या साधनाचा वापर करता येतो.

पारस्पारिक/दृष्टीकोन साधन संपादन

ह्या साधनाच्या आधारे गिम्प आज्ञावलीत एखाद्या प्रतिमेचे संपादन करताना ती प्रतिमा वेगवेगळ्या आयताच्या साहाय्याने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येते.

परिक्रमा/परिभ्रमण साधन संपादन

एखाद्या प्रतिमेला वेगवेगळ्या दिशानिर्देशाप्रमाणे हलवण्यासाठी ह्या साधनाचा वापर केला जातो. एखादे चित्र खालून वर किंवा वरून खाली वा डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे घड्याळी काट्याच्या दिशेने किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने परिक्रमा वा परिभ्रमण करण्यासाठी हे साधन उपयुक्त आहे.

रंगकुंचला(ब्रश) साधन संपादन

एखाद्या प्रतिमेत रंग भरण्यासाठी हे साधन वापरले जाते. जसे चित्रकलेत कागदावरील चित्रात ह्या रंगकुंचल्याच्या साहाय्याने रंग भरला जातो, तसाच रंग गिम्प आज्ञावलीतही भरला जातो.

बाह्य दुवे संपादन

https://www.gimp.org

  1. ^ "Licence-file".