काही व्यक्तींना एसटी बसमधून प्रवास करताना मळमळल्यासारखे वाटून उलटी (ओकारी) आल्यासारखे वाटते किंवा उलटी (ओकारी) होते. या प्रकारास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गाडी लागणे असे म्हणतात. त्याला / तिला गाडी लागते असा वाक्प्रचार प्रचलित आहे.