गणेश विसपुते
गणेश विसपुते हे एक कवी, समीक्षक, अनुवादक, चित्रकार आणि कला व सिनेमांवर लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत. सिव्हिल अभियंता असलेल्या गणेश विसपुते यांनी साहित्य, चित्र, शिल्प या कलांमधे काम केले आहे.त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी अनुवाद झाले आहेत.
पुस्तके
संपादन- आवाज नष्ट होत नाहीत (काव्यसंग्रह)
- धुवांधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध (काव्यसंग्रह)
- निरिहयात्रा (ललितलेख संग्रह)
- पिवळ्याधम्मक छत्रीतील मुलगी (अनुवादित, मूळ हिंदी पुस्तक- पीली छत्रीवाली लडकी, लेखक उदयप्रकाश)
- माय नेम इज रेड (अनुवादित, मूळ तुर्की लेखक - ओरहान पामुक)
- शासन समाज आणि शिक्षण (अनुवादित, मूळ लेखक कृष्ण कुमार)
- सिनार (काव्यसंग्रह)
पुरस्कार
संपादन- ’आवाज नष्ट होत नाहीत’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा २०१०-११ सालचा कवी केशवसुत पुरस्कार पुरस्कार
- ’माय नेम इज रेड’ला साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचा बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार (२०१५)
परत केलेले पुरस्कार