'खेडयाकडे चला' ही ग्रामीण लोक जीवनाशी निगडित असलेली एक अभिनव चळवळ आहे. ही चळवळ इ. स. १९१६ मध्ये सुरुवात झाली असून राष्ट्रपिता महात्मा गांधी या संंकल्पनेचे प्रणेते मानले जातात.[१]

खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी ‘खेड्याकडे चला' अशी हाक दिली. ज्यात गावखेडयाचे सक्षमीकरण हा महत्त्वपूर्ण हेतू होता.  आजही या अभिनव मोहिमेची उपयुक्तता जाणवत असून  शहरातील वाढता रोजगाराचा प्रश्न, वाढती गर्दी यामुळे गांधीजींचा हा मूलमंत्र  आर्थिक समस्येचे निराकरण करण्याचा मार्ग सुचवतो. कृषी ग्रामीण क्षेत्रातील उत्पादकता, गुंतवणूक, रोजगारनिर्मितीचे महत्त्व आदी बाबी यातून स्पष्ट होते.  प्रत्येक गावखेडी स्वयंपूर्ण व्हावे. ग्रामीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावे. असे महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात सांगितले.[२]

देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजना मध्ये गांधीजींच्या 'खेडयाकडे चला' या मुलमंत्राचा दखल घेऊन गावखेडयाच्या विकासासाठी योजना आखली गेली.या मुलमंत्रामुळे गावखेडी प्रकर्षाने अधोरेखित होऊन प्रगतीचे मार्ग तयार झाले. गावखेडीच्या संदर्भाने पुढे शासकीय स्तरावर विविध योजना राबविण्यात आल्या. परंतु या संकल्पनेत , मोहीमेपासून दुर्गम भागात निसर्ग सान्निध्यात वसलेेल्या तांडा, वाडीवस्ती मात्र पुुर्णपणे वंचित रााहीली. परिणामी तांडा, वाडीवस्त्त्याच्या तुलनेेत गावखेडे पुढारली. पुढे २०१६ मध्ये प्रवाहापासून वंचित असलेल्या तांडयाच्या सक्षमीकरणासाठी 'तांडेसामू चालो' हे तांडावादी विचार सर्जनशील विचारवंत एकनाथराव नायक यांनी प्रथमच रुजवले. १९१६ ते २०१६ असा तब्बल शंभर वर्षांचा कालावधी यात दिसून येतो. निश्चितच तांडा आणि प्रस्थापित गावखेडे हे विकासाच्या व आधुनिकतेच्या बाबतीत दोहोंत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट होते.त्यामुळे तांडा आणि गाव खेडी हे स्वतंत्र अभ्यासाचे विषय मानले जाते. तांडा सुद्धा ग्रामीण विस्थापित जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे 'खेडयाकडे चला' या संकल्पनेबरोबरच 'तांडेसामू चालो' या संकल्पनेचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. तांडे अजूनही दूर्लक्षितच राहिलेले आहे.[३] राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज्याची संकल्पना मांडली. त्यातून ग्रामीण विकास अधोरेखित केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे. सर्वामध्ये सलोखा निर्माण व्हावा. खेडयांची रचना व्यवस्थाबद्ध व्हावी असे ग्रामवादी विचार 'खेड्याकडे चला' या संकल्पनेतून मांडले गेले.[४] [५]

संदर्भ संपादन

  1. ^ "खेड्याकडे चला". महाराष्ट्र टाइम्स. २०१७.
  2. ^ "गांधीजींचा 'खेड्याकडे चला' नारा". Punerispeak. २०१७.
  3. ^ "बंजारा तांडा शिक्षित व्हावा, सक्षम व्हावा हेच स्वप्न". लोकमत. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ महात्मा, गांधी. माझ्या स्वप्नातील भारत. साकेत प्रकाशन.
  5. ^ "महात्मा गांधी आणि ग्रामीण विकास". एमएसजे. 2347-3150.