Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


खान अब्दुल गफारखान (१८९० - १९८८), सरहद्द गांधीबादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वतंत्रचा लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदाई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती. ही संघटना "सुर्ख पोश" या नावाने देखील ओळखली जात होती.[१]अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलन साठी ओळखले जात होते. ते महात्मा गांधी यांचे चांगले मित्र होते, ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना ‘फ्रंटियर गाँधी’ चा नावाने संबोधले जायचे. खुदाई खिदमतगारचा यशामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली, आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काही या दडपशाहीस बळी पडले. बच्चा खानने अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या भारताच्या फाळणीच्या मागणीचा जोरदार विरोध केला. जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विभागीय योजनेची स्वीकृती जाहीर केली. विभाजनानंतर त्यांनी पाकिस्तान सोबत राहण्याचा निर्णय घेतला.[२]

खान अब्दुल गफारखान
Khan Abdul Ghaffar Khan.jpg
जन्म ६ फेब्रुवारी १८९०
पेशावर , पाकिस्तान
मृत्यू २० जानेवारी १९८८
पेशावर
ख्याती सरहद्द गांधी, बादशाह खान
पुरस्कार भारतरत्न

विभाजनानंतर बच्चा खान यांनी पाकिस्तानशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली, पण १९४८ आणि १९५४ च्या दरम्यान पाकिस्तानी सरकारने त्यांना वारंवार अटक केली. १९६९ मध्ये पुन्हा युनिट कार्यक्रमाचा विरोधात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. १९८८ मध्ये पेशावर येथे त्यांचे निधन झाले.

सुरुवातीचे जीवनसंपादन करा

खान अब्दुल गफारखान यांचा जन्म ६ फेब्रुवारी १८९० मध्ये ब्रिटिश इंडिया पेशावर(पाकिस्तान) येथील उत्मान जई येथे झाला. त्यांचे वडील बहराम हे तेथील जमीनदार होते. स्थानीय पठाण लोकांचा विरोध असताना खान अब्दुल गफारखान यांचा वडिलांनी त्यांना व त्यांचा भावाला मिशन स्कूल मध्ये शिकवले. त्यानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण अलीगढ मुस्लिम महाविद्यालय मध्ये पूर्ण केले. १९१० मध्ये त्यांनी आपल्या गावामध्ये एक शाळा उघडली. त्यानंतर १९११ साली ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. १९१५ साली ब्रिटिश अधिका-याने त्यांचा शाळेवर बंदी घातली.[३]

खुदाई खिदमतगारसंपादन करा

खान अब्दुल गफारखान यांना आझाद आणि धर्मनिरपेक्ष असा भारत देश पाहिजे होता, हे लक्ष पूर्ण करण्यासाठी त्यांनी १९२९ मध्ये ' १९२९ मध्ये 'खुदाई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती. ही संघटना "सुर्ख पोश" या नावाने देखील ओळखली जात होती.' नावाची संघटना उभारली होती. ही संघटना "सुर्ख पोश" या नावाने देखील ओळखली जात होती. खुदाई खिदमतगारची स्थापना महात्मा गाँधींचा अहिंसा आणि सत्याग्रह सारख्या सिद्धांतावरून प्रेरित होऊन केली गेली होती. ह्या संघटनेमध्ये साधारणतः १,००,००० सदस्य सामील झाले. आणि त्यांनी शांततापूर्वक इंग्रज पुलिसांचा विरोध केला.[४][५]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर". bharatdiscovery.org (hi मजकूर). 2018-08-20 रोजी पाहिले. 
  2. ^ "स्वतंत्रता सेनानी “अब्दुल घफ्फार खान” | Khan Abdul Ghaffar Khan". ज्ञानी पण्डित - ज्ञान की अनमोल धारा (en-US मजकूर). 2017-08-23. 2018-08-20 रोजी पाहिले. 
  3. ^ "Abdul Ghaffar Khan Biography in Hindi | अब्दुल गफ्फार खा की जीवनी". Biography Hindi (en-US मजकूर). 2017-04-01. 2018-08-20 रोजी पाहिले. 
  4. ^ "ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान की जीवनी - Khan Abdul Gaffar Khan Biography in Hindi". It's Hindi (en-US मजकूर). 2015-07-31. 2018-08-20 रोजी पाहिले. 
  5. ^ eBiography. "ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान जीवनी - Biography of Bacha Khan". http://jivani.org (en मजकूर). 2018-08-20 रोजी पाहिले.