खाणी (हिंदू तत्त्वज्ञान)
भारतीय हिंदू वेदांत दर्शनानुसार सृष्टी ही चार प्रकारच्या निर्मितीत मोडते, म्हणजे कोणताही सजीव प्राणी हा चार प्रकाराने जन्माला येतो.
- जारज
- अंडज
- स्वेदज
- उद्भिज
जारज
संपादनगाय, म्हैस इत्यादी पशु, हरिणे, ज्यास दोन्हीकडे दात आहेत असे व्याल, राक्षस, पिशाचे व मनुष्ये हे जरायुज प्राणी आहेत. जरायु म्हणजे वार; त्यातून हे प्राणी बाहेर पडतात म्हणून ते जरायुज होत. ॥४३॥
अंडज
संपादनपक्षी, सर्प, नक्र, मत्स्य, कासवे व अशाच प्रकारचे सरडे इत्यादी स्थलचर व शंखादि जलचर प्राणी ते अंडज होते. हे प्रथम अंड्यात होतात व नंतर त्यातून निघतात म्हणून हे अंडज होत. ॥४४॥
स्वेदज
संपादनचिलटे, उवा, माशा, ढेकूण इत्यादी प्राणी व तसेच प्रत्यक्ष उष्णतेपासून होणारे मुंग्यासारिखे व असेच दुसरेही प्राणी स्वेदज होय. स्वेद म्हणजे पार्थिव पदार्थास उष्णतेमुळे प्राप्त होनारा ओलसरपणा, त्याच्यापासून वरील प्राण्यांची उत्पत्ति होते म्हणून त्यास स्वेदज म्हणतात. ॥४५॥
उद्भिज्ज
संपादनवृक्षादि स्थावर पदार्थ उद्भिज्ज आहेत. कारण, ते बीज व भूमी यांस फोडून वर येत असतात. पण त्यांच्यामध्ये दोन प्रकार आहेत. काही बीजापासून निर्माण होतात व काहींच्या शाखा भूमीत पुरल्या तरी त्याच्यापासून वृक्ष होतात. आता त्यात ज्या औषधी असतात त्यांची फळे पक्व झाली की, त्या मरतात व त्यास पुष्कळ फुले व फळे येतात. ॥४६॥
संदर्भ : अध्याय १ला मनुस्मृती