खरूज
खरूज (इंग्लिश: scabies) ही शरीराला येणारी एक प्रकारची खाज आहेअशी खाज सरकॉप्टस स्कॅबीई (Sarcoptes scabiei) या जीवाणूमुळे होते. हा जीवाणू आठ पायांचा असून परजीवी आहे. हे जीवाणू आकाराने खूपच लहान असतात. ते सारखी त्वचा खोदत असतात. त्यामुळे त्वचेच्या त्या भागावर खूप खाज सुटते. रात्री ही खाज अजूनच वाढते. हे जीवाणू माणसाच्या सामान्य नजरेला दिसत नाहीत, परंतु भिंगाच्या किंवा सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने बघता येतात.
खरूज कशी पसरते ?
संपादनखरजेचे किडे खूपच संवेदनशील असतात. बहुतांश स्थितींमधे ते रोगी माणसाच्या शरीरावर २४ ते ३५ तास जगतात. दोन माणसांदरम्यान त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार या किड्यांचा प्रसार होतो. मनुष्याला ज्या किड्यांचा संसर्ग होतो त्यापेक्षा भिन्न किड्यांचा संसर्ग कुत्रा/मांजरांना होत असल्याने या प्राण्यांपासून माणसाला रोगसंसर्ग होत नाही.
लक्षणे
संपादनखरजेमुळे बोटांच्या मधल्या भागात, मनगटांवर आणि कोपरांच्या मागच्या बाजूला, गुप्तांगाच्या जागी आणि गुडघ्यांवर तसेच पार्श्वभागावर छोटे उंचवटे आणि फोड येतात. खाज होणे हे खरजेचे सर्वात सामान्य लक्षण आहे. दिवसेंदिवस ही खाज तीव्र होत जाते.[१]
उपाय
संपादन- बिछान्यावरील चादरी इत्यादी कपडे गरम पाण्याने धुवावेत म्हणजे त्यांतील जंतू नष्ट होतील.
- अचूक निदान आणि उपचारासाठी एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
- शरीराची स्वच्छता ठेवणे हे खरूज होऊ नये म्हणून तसेच झाल्यास त्याचा उपचार म्हणून गरजेचे आहे. रोज अंघोळ करण्याचा सल्ला यासाठी दिला जातो. हा एक अस्वच्छतेमुळे होणार आजार आहे.
- ^ "खरुज साठी निंबोळी तेल". 2017-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-18 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)