खंडो कृष्ण गर्दे (जन्म : गुर्लहासूर-बेळगाव जिल्हा, २ डिसेंबर १८४८; - पुणे, १३ ऑगस्ट १९२६) ऊर्फ बाबा गर्दे हे एक कानडी आणि मराठी भाषांत लेखन करणारे सव्यसाची लेखक-कवी होते.

त्यांचे शिक्षण सातवीपर्यंतच झाले होते, पण वडील शांकरवेदान्ती असल्याने बाबांना लहानपणापासूनच वेदान्ताची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात त्यांनी काही काळ प्राथमिक शाळांत शाळा-तपासणीचे काम केले.

सिद्धारूढ स्वामी यांच्या सांगण्यावरीन गर्दे यांनी संस्कृत पंचदशीचे आरंभी कानडीत पद्यमय आणि नंतर मराठीत गद्य-पद्यात्मक भाषांतर केले. वेदान्ताची ओळख सर्वसामान्यांना व्हावी म्हणून त्यांनी ग्रंथरचना केली. त्यासाठी तत्त्वज्ञान सोपे करून सांगणारी वेगवेगळ्य़ा चालीतील आणि वेगवेगळ्या रागांत त्यांनी पद्यरचना केली.

खंडो कृष्ण गर्दे यांचे ग्रंथ

संपादन
  • गीतामृतशतपदी (१८७०) : गीतेचे सार सांगणारे १०० गीतांचे काव्य.
  • ब्रह्मसिद्धान्तमाला (गद्य) (१९१०)
  • लघुवासुदेवनमन (गद्य) (१९१०)
  • विजनपुरी (१८८४) : गोल्डस्मिथच्या ’डेझर्टेड व्हिलेज’ या काव्याचे १७० कडव्यांत भाषांतर.
  • श्रीगीतपंचदशी किंवा वेदान्तशतक (१८९४ पूर्वी) : विद्यारण्यांच्या संस्कृत पंचदशीतील वेदान्त सोपा करून सांगणारे पद्य.
  • स्फुट शतपदी (१९२७-मृत्युपश्चात प्रकाशन)
  • संगीत चूडालाख्यान : हे अपूर्ण काव्य पुढे १९३७ साली कवी कृष्णाजी गोविंद ताम्हनकर यांनी पूर्ण केले.
  • विद्यारण्यकृत सार्थ पंचदशी (गद्य) (१८९५)