क्षीरचंपक किंवा देवचाफा (इंग्लिश: Plumeria rubra Linn,Plumeria obtusa Linn.)

Plumeria acutifolia
Plumeria alba 0005

या झाडातून निघणाऱ्या पांढऱ्या, दुधासारख्या दिसणाऱ्या चिकावरून या झाडाला क्षीरचंपक असे नाव पडले.[ संदर्भ हवा ] एप्रिल-नोव्हेंबर या महिन्यात हा वृक्ष संपूर्ण फुललेला असतो. हा वृक्ष प्रतिकूल परिस्थितीतही वाढतो.

हे पानगळीचे झाड असून ते हिवाळ्यात निष्पर्ण असते.पाण्याचे दुर्भिक्ष झाल्यास,पानांद्वारे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे,आपल्या अंगात साठवलेल्या पाण्याचा ऱ्हास टाळण्यासाठी झाड आपली पाने गाळून टाकते.हे झाड विषारी असले तरी यात अनेक औषधी गुण आहेत. खुरचाफ्याच्या पाच पाकळ्यांच्या फुलांचा गंध,गोड सुवास असतो.कधी तो मोगऱ्यासारखा,कधी लिंबासारखा तर कधी सोनचाफ्याच्या सुवासाप्रमाणे वाटतो.देवचाफ्याच्या पांढऱ्या पिवळसर छटा असलेल्या प्रकारांत जेवढा आल्हादायक दरवळ असतो तेवढा लाल-गुलाबी छटा असलेल्या फुलांमध्ये नसतो.

क्वचितच या झाडाला शेंगा येतात-जुळ्या शेंगा,काही फुलांचे रूपांतर जुळ्या शेंगात होते.शेंगेत अत्यंत शिस्तबद्धतीने बियांची रचना केलेली असते.बिया पातळ असून त्याच्या सभोवार पातळ पापुड्याचा पंख असतो.शेंग जुनी होवून तडकली कि ही बियांची पिलावळ खट्याळ वारा चहुबाजूस उधळून टाकतो.वाऱ्यावर स्वार होवून या दूर-दूरपर्यंत प्रवास करतात.

संदर्भ संपादन

  • वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक