क्लेड
क्लेड किंवा जीवशाखा म्हणजे जीव जातिंचा एक असा समूह ज्यामध्ये एक जात आणि त्यापासून विकसित झालेल्या सर्व जाती समाविष्ट असतात. जीववैज्ञानिक वर्गीकरण मध्ये क्लेड जीवन वृक्षाची एक शाखा मानली जाते. 'क्लेड' शब्द फार् नवीन आहे आणि १९५८ मध्ये ब्रिटिश जीववैज्ञानिक जूलियन हक्सली हिने हा शोधला होता. क्लेडिकीच्या विज्ञानामध्ये सर्व जीवांना त्यांच्या क्लेड नुसार वर्गीकृत करून त्यांचा अभ्यास केला जातो. प्रजातींचा पूर्वज एक पेशी, एक समुह, एक प्रजाती (मृत किंवा अस्तित्वातील) असू शकतो. प्रत्येक क्लेड ही एकमेकांमध्ये गुंतलेली शाखा असते आणि परत लहान लहान शाखांमध्ये विभागली जाते.