क्रिस्पर हे तंत्रज्ञान बॅक्टेरियाकडून विषाणूंसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिकारपद्धतीवर आधारित आहे. जेव्हा एखादा विषाणू बॅक्टेरिया मध्ये त्याचे डीएनए सोडतो त्यावेळी बॅक्टेरिया कॅस नाईन हे प्रथिन वापरून त्या विषाणूच्या डीएनएचे तुकडे करतात आणि या डी एन एचे तुकडे बॅक्टेरीयाच्या गुणसुत्रांमध्ये सामावून घेतले जातात. यानंतर डि एन ए मध्ये जोडलेल्या विषाणूंच्या जीन्सची नक्कल आर एन ए मध्ये केली जाते आणि हे आर एन ए कॅस नाईन सोबत जोडले जाऊन ते भविष्यात होऊ शकणाऱ्या विषाणूंच्या हल्ल्यापासून बचावासाठी वापरले जाते. परीणामी या बॅक्टेरीयाला किंवा त्याच्या वंशजांना पुन्हा कधीही या विषाणू पासून धोका उद्भवू शकत नाही.

आता कॅस नाईन या प्रथिनाबरोबर डी एन एच्या भागाशी मिळतेजुळते आर एन ए जोडून शास्त्रज्ञ नेमक्या ठिकाणी डि एन ए तोडू शकतात. आपल्याला आवश्यक तो डि एन एचा तुकडा या ठिकाणी जोडून शास्त्रज्ञ डी एन ए मध्ये हवा तो बदल घडवून आणू शकतात.