कौस्तुभ राणे
मेजर कौस्तुभ राणे भारतीय सैन्यातील सैनिक होते. हे काश्मीरमध्ये आतंकवादींशी लढताना शहीद झाले.
मेजर कौस्तुभ राणे | |
---|---|
जन्म |
कौस्तुभ ठाणे, मुंबई, महाराष्ट्र |
मृत्यू |
८ ऑगस्ट २०१८ जम्मू काश्मीर |
मृत्यूचे कारण | शहिद |
नागरिकत्व | भारत |
प्रशिक्षणसंस्था | भारतीय सेना |
पेशा | भारतीय थलसेना |
कारकिर्दीचा काळ | २०१३ सैन्यात दाखल |
ख्याती | भारतीय सैनिक |
पदवी हुद्दा | मेजर |
जोडीदार | कनिका राणे |
अपत्ये | अगस्त्य |
पुरस्कार | सेना मेडल |
विस्तार
संपादनमेजर कौस्तुभ राणे[१] यांनी मीरा रोडच्या होली क्रॉस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ते मीरा रोडच्या रावल जुनियर कॉलेजमध्ये होते. मीरारोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत पहिल्या मजल्यावर राणे कुटुंब राहते. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. पण, अनेक वर्षांपासून मीरारोड परिसरात आहेत.
सारांश
संपादनसोमवारी (कोणता सोमवार??) रात्रीपासूनच घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी भारतीय जवानांचा लढा सुरू होता. आज सकाळी मेजर राणेंसह तीन जवान शहीद झाल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचे वृत्त समजताच परिसरात (कोणत्या?) शोककळा पसरली आहे. याच(?) भागात कौस्तुभ राणे लहानाचे मोठे झाले. येथील हॉली क्रॉस शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले होते. तर त्यांचे वडीलही राणे काका म्हणून या भागात सुपरिचित आहेत. कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत तर आई ज्योती या बोरिवलीच्या गोखले शैक्षणिक संस्थेत होत्या. सध्या दोघेही निवृत्त आहेत. तर कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका व अडीच वर्षांचा मुलगाही येथेच(?) राहायला आहेत. पत्नी कनिका मुलास घेऊन गावी गेल्या होत्या तर आई-वडीलही गावी जायच्या तयारीत होते.
सन्मान आणि पुरस्कार
संपादनकौस्तुभ यांना यंदा(?) सेना मेडल या पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
अवश्य पहा
संपादन- ^
"Major Kaustubh Rane: शहीद मेजर कौस्तुभ राणे को इसी साल मिला था प्रमोशन, कैप्टन से बने थे मेजर - major kaustubh rane killed in loc in north kashmir". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2019-11-02 रोजी पाहिले.[permanent dead link]