कोव्ह फोर्ट हे अमेरिकेच्या युटा राज्यातील एक ठिकाण आहे. या ठिकाणी मॉर्मोन पंथाच्या लोकांनी १८६७मध्ये एक छोटा भुईकोट बांधला होता. त्यावेळच्या युटा प्रदेशाची राजधानी फिलमोर आणि बीव्हर शहरांच्या साधारण मध्यावर असलेला किल्ला या रस्त्यावरून जाणाऱ्या मॉर्मोन प्रवाशांचे रक्षण करीत असे.

हा किल्ला इंटरस्टेट ७०च्या पश्चिमेकडील शेवटापासूनचे सगळ्यात जवळचे वसतीस्थान आहे.