कोविड-१९ काळातील मानसिक स्वास्थ्य

कोव्हिड-१९काळातील मानसिक स्वास्थ्य ही एक मानसिक, सामाजिक,कौटुंबिक आणि व्यक्तीगत स्तरावरील संकल्पना आहे.केवळ भारतातच नव्हे तर रंपूर्णजगाला विविध मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न प्रामुख्याने निर्माण होत आहेत.संपूर्ण जगात याविषयी मार्गदर्शनपर उपक्रम राबविले जात आहेत.

संकल्पना

संपादन

जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळै जनजीवन ठप्प झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लाॅकडाऊन अर्थात सर्वांनी घरात रहावे अशी घोषणा आणि योजना शासकीय स्तरावर करण्यात आली आहे. यामधे नागरिकांच्या आरोग्याची काळजी हा मुख्य घटक केद्रस्थानी आहे. असे असले तरी घरातच सतत राहिल्याने नागरिकांना मानसिक नैराश्य येऊ लागले आहे. समाजात सतत वावरण्याची सवय असल्याने लहान मुले, प्रौढ,वृृृृद्ध अशा सर्व स्तरातील नागरिक सातत्याने घरातच अडकलेले असल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले आहे.[]

कारणे

संपादन

अचानक उद्भवलेल्या लाॅकडाऊनमुळे जनजीवन पूर्वकल्पना नसताना स्थगित झाले आहे.त्यामुळे नैराश्य, भीती,चिंता अशा भावनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य यामुळे धोक्यात आले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखला जाईल आणि जगावरील आरोग्याचे संकट दूर होऊन जनजीवन पूर्वपदावर कधी येईल तसेच जनजीवन पूर्ववत् सूरु झाल्यावरदेखील पुन्हा रोगाचा संसर्ग वाढेल काय, बाजारपेठेवर काय परिणाम होईल,जीवनावश्यक सुविधा उपलब्ध होतील काय याविषयी जनमनात अस्वस्थता आणि अस्थिरता अनुभवाला येते आहे.विशेषतः लहान मुले पूर्णवेळ घरातच बंदिस्त झाल्याने लहान मुलांच्या मानसिक समस्या निर्माण होत आहेत. सातत्याने कुटुंबासह रहावे लागत असल्याने महिलांच्या मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्याच्या समस्याही दिसू लागल्या आहेत.कौटुंबिक हिंसाचारात वाढ हौते आहे. नोकरदार महिलांना घरून काम करणे(Work from Home) या पद्धतीने कार्यालयीन जबाबदारी पूर्ण करावी लागत असून कुटुबातील दैनंदिन कामेही करावी लागत आहेत.या सर्वांमुळे व्यक्ती आणि कुटुंब यातील मानसिक अस्थिरता वाढते आहे.मानवी नातेसंबंधांवर याचा परिणाम होतो आहे.

उपाययोजना

संपादन

मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी राज्य शासन आणि महापालिका यांनी पुढाकार घेतला असून महिला आयोगाच्या वतीने मोफत समुपदेशन हेल्फलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.हिंदी,इंग्रजी,गुजराती आणि मराठी या चार भाषांमधे अशी सेवा उपलब्ध आहे. प्रशिक्षित समुपदेशक तसेच मानसिक आरोग्य तज्ज्ञ यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.[]


  • लहान मुलांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी-

लाॅकडाऊनच्या काळात अचानक घरात अडकलेली लहान मुले आपलीशाळा,मित्र मैत्रिणी,खेळ यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे सतत बाहेर जाण्याची,खेळण्याची सवय असलेल्या मुलांना घरात आनंदी ठेवण्यासाठी पालकांनी त्यांना विश्वासात घ्यावे.त्यांच्या सर्व शंकांना यथायोग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.त्यांच्यासह गुणवत्तापूर्ण वेळ घालवावा,त्यांच्या मित्रमंडळींशी सामाजिक माध्यमाद्वारे संपर्कात राहण्याची संधी त्यांना द्यावी असे मानसतज्ज्ञ सांगत आहेत.

  • कौटुंबिक नातेसंबंध-

सतत एकमेकांबरौबर रहावे लागत असल्याने पत्नी आणि पतीच्या सहजीवनात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.सर्वांना घरातील कामांची सवय नसल्याने अशी कामे करण्यासंदर्भातही वाद होत आहेत.घरातील नोकरदार महिला घरून काम करीत असल्या तरी कुटुंबातील वरिष्ठ सदस्य त्यांना त्यासाठी सहकार्य करीत नाहीत अशा तक्रारी समुपदेशकांकडे येत आहेत. प्राप्त परिस्थितीचा सामना करताना कुटुंबातील प्रौढ सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य टिकून रहावे यामुळे परस्परांशी सौहार्दाने वागावे असे समुपदेशक नागरिकांना सांगत आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ प्रभात वृत्तसेवा (१५ एप्रिल २०२०). "लॉकडाऊनमुळे बिघडतेय मानसिक स्वास्थ्य". प्रभात वृत्तसेवा. २६ एप्रिल २०२० रोजी पाहिले.
  2. ^ लोकसत्ता ऑनलाईन (९ एप्रिल २०२०). "लॉकडाऊन काळात मानसिक स्वास्थ्यासाठी सरकारचं महत्वाचं पाऊल; तज्ज्ञ डॉक्टरांचा मिळणार मोफत सल्ला". लोकसत्ता ऑनलाईन. २६ एप्रिल २०२० रोजी पाहिले.